Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोघांनाही खूप आनंद झाला; पण त्याहून थक्क करणारी गोष्ट म्हणजे लोक चित्रांचे डोकं टेकवून दर्शन घेत होते, चित्रांपुढे पैसे ठेवत होते. मंदिरात आल्याप्रमाणे त्यांचे वर्तन चालले होते. बडोद्यातलं प्रदर्शन हजारो लोकांनी पाहिले. बडोद्याच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती की लोकांसाठी चित्रप्रदर्शन खुले ठेवण्यात आले होते.
 सगळ्या चित्रांना राजा रवी वर्मांच्या निगराणीखाली दरबार हॉलमध्ये नीटनेटके लावले गेले. याखेरीज राजा रवी वर्मांनी बडोदा वास्तव्यास असताना सन १८९० साली राजकुटुंबापैकी ७ जणाचे तैलचित्र काढले आहेत. यात महाराणी चिमणाबाई (पहिल्या) यांच्या दोन तसबिरी, महाराणीसाहेब (दुसऱ्या) यांच्या दोन पोट्रेट . तसेच जयसिंगराव, युवराज फत्तेसिंगराव आणि संपतराव गायकवाड यांचाही यात समावेश आहे. पौराणिक विषयावरील अस्सल १४ तैलचित्रांचा संग्रह आहे.
 १. श्रीरामचंद्राचा विवाह
 २. श्रीकृष्णाची दृष्ट
 ३. गंगा आणि शंतनू
 ४. कारागृहातून श्रीकृष्णाला वसुदेव घेऊन निघतो.
 ५. मत्स्यगंधा
 ६. विश्वामित्र मेनका
 ७. कीचक आणि सैरंध्री

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ३३