वर काढतो. अलीकडील सिंध व पंजाब येथील उत्खननांवरून हिंदुस्थानचा पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहासाच समोर आला. त्यात सापडलेली चित्रे, मूर्ती वगैरेंवरून, तसेच अजिंठा, वेरूळ वगैरे ठिकाणच्या चित्रांवरून प्राचीन संस्कृतीच्या इतिहासाचे दुवे जुळवावे लागतात. ३००० वर्षापूर्वीचे मोहोंजदडे आणि हडप्पा येथील चित्रे, मूर्ती, पुतळे वगैरे अजून अस्तित्वात असून, ती आता सापडल्याने त्यांच्या आधारानेच मागील इतिहासाचा मागोवा घेणे शक्य होत असते. हे सर्व लक्षात आल्याने महाराजांनी आपल्या राज्यात एक मोठा कलासंग्रह निर्माण करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी युरोपातून स्पीलमन् नावाच्या तज्ज्ञास भारत आणले. त्याच्या मदतीने युरोपातील उत्कृष्ट कलावंतांची चित्रे खरेदी करून त्यांनी बडेद्यात आणली.
आणि विविध ललितकलांना उत्तेजन दिले.
राज्यकारभार सांभाळताना महाराजांना अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून जावे लागत असे. एकीकडे शिस्तीचे सुप्रशासन तर दुसरीकडे साहित्य, संस्कृती आणि कलेबद्दलची अभिरुची ! राज्यकारभाराचे काम हे व्यावहारिक दृष्टीने सरळ रेषेत चालणारे असते, तर चित्रकलेच्या वक्र रेषांत साठवलेल्या सौंदर्याची अनुभूती घेण्यास त्याच्याकडे मुद्दाम वळून पाहावे लागते. जे वर दिलेल्या इंग्रजी कवितेतून फार सुंदरपणे व्यक्त केले गेले आहे. प्रजेची उन्नती सांस्कृतिकदृष्ट्या करून प्रजेची कलेतली अभिरुची वाढविण्यासाठी आणि अवलोकनार्थ राज्यातील
पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/१२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / १२