Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेथील सिमॅब्यू व गिओतो या तेराव्या शतकातील चित्रकाराच्या कृतींपासून तो आजपर्यंतच्या चित्रसंग्रहांवरून दिसून येतो. हिंदुस्थानातल्या ऐतिहासिक चित्रांना एकत्र व्यवस्थित नीट न जतन केल्याने असा चित्रसंग्रह आपल्याकडे सापडत नाही. आपल्या ऐतिहासिक कला वैभवांनी निरनिराळ्या राजवटीचे अनुभव घेतले. ज्यांनी हिंदुस्थानावर राज्य केले त्या त्या वेळेस हा कलेचा सांस्कृतिक ठेवा आपपसातल्या हेव्यादाव्यांचा शिकार बनला. या सांस्कृतिक ठेव्याने खूप आघात सोसले. इतिहासात एकेकाळी सन्मानाने मिरविलेल्या वास्तूंनी मूर्तिभंजकांच्या हातोड्यांचे घाव सोसले. तसेच वेडेपणांनी विस्तवाच्या मशालींनी या वैभवाची राखरांगोळी केली. त्यामुळे तो इतिहास आपल्याला पूर्ण समजणे तसे अवघडच आहे. याचीच जाणीव महाराजांना चांगली झाली होती.
 एका कवीने म्हटले आहे की,
 All passes, art alone Enduring Stays to us;
 The bust out - Lasts the throne;

(The Coin, Tiberius).

 जगातील सर्व वस्तू नष्ट झाल्या, तरी कला मात्र शिल्लक राहते., राजांची सिंहासने नष्ट झाली, तरी त्यांच्या पुतळ्यांवरून व नाण्यांवरून मागील इतिहास जुळविता येतो.
 परंतु जंगली लुटारूंच्या दांडगाईने हे कलेचे नमुनेही नाहीसे झाले, तर इतिहासाची जुळणी करणे अर्थातच जास्त कठीण होते. तथापि कधी-कधी तो गत इतिहास आपण होऊन आपले डोके

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / १०