पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांनी या संस्थेला १८८५ ते १८८९ पर्यंत असे ५४ वर्षे अखंडपणे आर्थिक पाठबळ दिले. ही मदत ५ लाख २९ हजार ५५६ रु. इतकी होती. आजच्या रकमेच्या दरात या रकमेचे कमीतकमी मूल्य ७२ कोटी २५ लाखांहून अधिक भरते. राजर्षी शाहू महाराजांचा म्हस्केंशी पत्रव्यवहार होता. वसतिगृह, शिक्षण आणि संस्थानी प्रशासनासाठी शिकलेले लोक मिळवण्यासाठी हा पत्रव्यवहार होत होता.
 १८९४-९५ च्या दरम्यान शाहू महाराजांनी म्हस्केंना बहुजन समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांची नावे मागितली होती. त्यांनी दाजीराव अमृतराव विचारे आणि भास्करराव विठ्ठलराव जाधव या दोन होतकरू तरुणांची नावे शाहू छत्रपतींना कळविली. पुढे शाहू महाराजांनी भास्करराव जाधवांची ८ जून १८९५ रोजी असिस्टंट सरसुभे म्हणून कोल्हापूर संस्थानात नेमणूक केली. पुढे २७ वर्षे भास्करराव जाधवांनी कोल्हापूर संस्थानात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.शाहू महाराजांनी दाजीराव विचारे यांनाही बांधकाम विभागाचे प्रमुख केले. या उदाहरणावरून १८८५ पासून सयाजीरावांनी या संस्थेला दिलेला राजाश्रय महाराष्ट्राला किती उपकारक ठरला हे सूचित होते. तर सयाजीरावांचे आर्थिक पाठबळ मिळालेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर शिकलेल्या ३२ व्यक्ती कोल्हापुरात महत्त्वाच्या पदांवर होत्या. यामध्ये जिवाजीराव सावंत, पहिले क्षात्रजगत्गुरू सदाशिवराव पाटील बेनाडीकर, कोल्हापूर संस्थानातील पहिले

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ३२