पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
मराठी भाषा, साहित्य व संस्कृती

 मानवी संस्कृतीचा परिपूर्ण विकास हा राज्यकर्त्यांच्या धोरणावर अवलंबून असतो. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याबाबत केलेले काम हे इतके मूलभूत आहे की या क्षेत्रात इतका संतुलित, चौफेर विचार आणि विकास करणारा प्रशासक जगाच्या इतिहासात फारच अपवादात्मक ठरेल. पाककला, लोकसाहित्य, व्यायाम, कृषी यासह अनेक विषयांवरील माहिती आणि ज्ञान केंद्रस्थानी ठेवून मराठीतील पहिला ग्रंथ निर्मितीचा मान ज्यांना जातो ते महाराजा सयाजीराव गायकवाड मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे आजवरचे सर्वात मोठे पाठीराखे होते. १८०० हून अधिक मराठी ग्रंथांचे प्रकाशन महाराजा सयाजीरावांनी केले होते. म्हणूनच मराठीतील एक महत्त्वाचे प्रकाशक बाबा भांड म्हणतात, “सयाजीराव महाराजांएवढा मोठा प्रकाशक गेल्या शतकात झाला नाही.”

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / ६