पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्मवीरांची प्रेरणा
 शैक्षणिक कार्यासाठी सयाजीरावांकडून मिळालेल्या प्रेरणेविषयी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, “१९०६ ला मी सयाजीराव महाराजांचं अंत्यज्योध्दारासंबंधीचं भाषण वाचलं आणि निश्चय केला, हेच काम आजन्म करायचं. गरीब व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाचं काम वसतिगृहाच्या माध्यमातून सुरू केलं. " १९३९ मध्ये जेव्हा सयाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण म्हणून कर्मवीरांनी १९४० मध्ये सातारा येथे महाराजा सयाजीराव गायकवाड हायस्कूल सुरू केले. सामाजिक कार्य करण्यासाठी जाणीवपूर्वक मनुष्यबळ तयार करण्याचा महाराजांचा अंतस्थ हेतू यातून सफल झाल्याचे दिसते.

 १ ऑगस्ट १८९८ रोजी छोट्याशा जागेत स्थापन झालेले मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे महाराष्ट्रीयन ग्रंथालय चळवळीतील स्थान महत्त्वपूर्ण आहे. या संस्थेच्या नवीन इमारतीची १७ डिसेंबर १९१० रोजी पायाभरणी आणि ७ नोव्हेंबर १९९२ रोजी या इमारतीचे उद्घाटन हे दोन्ही कार्य महाराजांच्या हस्तेच झाले. या ग्रंथालयाच्या उभारणीसाठी सयाजीरावांनी १,००० रु.चे आर्थिक साहाय्य केले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम अंदाजे ५० लाख हून अधिक भरेल. आज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याचा मानदंड असणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची उभारणी करून महाराजांनी आधुनिक

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / २४