पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रीसयाजीविजय साप्ताहिक

 दामोदर सावळाराम यंदे आणि रामजी संतुजी आवटे 'बडोदावत्सल'च्या कामातून वेगळे झाल्यानंतर यंदेंनी महाराजांच्या परवानगीने १८९२ मध्ये 'श्री सयाजीविजय' हे नवे साप्ताहिक ३१ नोव्हेंबर १८९३ रोजी सुरू केले. या साप्ताहिकाचे संपादक दामोदर सावळाराम यंदेच होते. हे साप्ताहिक सुरू करताना दिलेल्या पुढील जाहिरातीवरून या साप्ताहिकाच्या उद्देशाची कल्पना येते. या जाहिरातीचा मजकूर असा होता की, " श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादुर यांचे विद्याप्रसारादि गुणांच्या चिरकाल स्मरणार्थ श्रीसयाजीविजय आबालवृद्ध स्त्रीपुरुषांच्या सतत उपयोगी पडणारे साप्ताहिक वर्तमानपत्र” यावरून 'सयाजीविजय' मधील बातम्यांच्या मजकुराच्या आशयाची कल्पना येते. हे साप्ताहिकसुद्धा मराठी, इंग्रजी व गुजराथी या तिन्ही भाषेत निघत होते. सयाजीविजय हे कट्टर सत्यशोधक विचारांचे नसले तरी यात सत्यशोधक समाज व चळवळीच्या संदर्भातील मजकूर यात प्रसिध्द होत असत. १८९६ नंतर ते गुजराथी व मराठी अशा दोनच भाषांमधून प्रसिद्ध होऊ लागले. या पत्राने चांगला लौकिक मिळवला.

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / १४