पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव आणि बाबासाहेब आंबेडकर

 महात्मा गांधींप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनादेखील सयाजीराव महाराजांनी भक्कम पाठबळ दिले. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या तीनही गोलमेज परिषदांचे सयाजीराव महाराजांना संस्थानचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण होते. पहिल्या दोन परिषदांना सयाजीराव स्वतः उपस्थित राहिले. १९३१ च्या लंडन येथील गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब उपस्थित होते. या परिषदेतील डॉ. आंबेडकरांचे विद्वत्तापूर्ण भाषण आणि दलित व अस्पृश्यांबद्दलचे विचार ऐकल्यानंतर सयाजीरावांनी खूश होऊन डॉ. आंबेडकरांना लंडनमधील हॅन्स क्रिसेंट हॉटेलमध्ये पार्टी दिली. या पार्टीत सयाजीरावांनी बाबासाहेबांचे पूर्वायुष्य व विद्वत्ता विशद करणारे भाषण केले. यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या आवाहनानुसार उपस्थित मान्यवरांनी अस्पृश्योद्धाराच्या कामाला भरघोस मदत केली. यामध्ये महाराजांच्या १५० पौंडसह इतर मान्यवरांच्या १,३३५ पौंडच्या मदतीचा समावेश होता. आजच्या रुपयाच्या मूल्यात ती रक्कम ४ कोटी ४४ लाख रु. हून अधिक भरते.

ब्रिटिश गुप्तचर विभाग आणि सयाजीराव

 मराठा बारगिरांनी जन्माला घातलेल्या 'गनिमी कावा' युद्ध तंत्राचा विकास निजामशाही साम्राज्याचा सेनापती मलिक अंबरने केला. तर या तंत्राचा उत्तम उपयोग करत शिवाजी महाराजांनी तत्कालीन भारतात ‘सर्वात वेगवान' म्हणून ओळखले जाणारे

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ३८