पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कौतुक अधिक तीव्र करणारी बाब म्हणजे भारतात बुद्ध धर्माचे पुनरुज्जीवन होण्याअगोदर महाराजांनी भगवान बुद्धामध्ये अतिशय उच्च प्रतीची रुची दाखविली. तसेच बुद्धाबद्दल अतीव प्रेम व्यक्त केले.” विशेष म्हणजे २ मे १९३१ ला मुंबई येथील डॉ. नायर यांच्या बुद्ध विहाराचे उद्घाटनसुद्धा सयाजीरावांच्याच हस्ते झाले होते. सयाजीराव महाराजांनी त्यांच्या अभ्यासिकेत अभ्यासाच्या टेबलावर बुद्धांची मूर्ती ठेवली होती. बौद्धिकदृष्ट्या सयाजीरावांचे आणि गौतम बुद्धाचे नाते किती जवळचे होते हे यातून स्पष्ट होते.
 पुढे ३० डिसेंबर १९३७ रोजी कलकत्ता येथे केलेल्या, बेंगाल बुद्धिस्ट असोसिएशनच्या स्वागतपर भाषणात सयाजीरावांनी मांडलेले विचार त्यांच्या बुद्ध प्रसाराप्रतीच्या तळमळीची साक्ष देतात. या भाषणाच्या अखेरीस सयाजीराव म्हणतात, “आपल्या संस्थेचे प्रचारक आमच्या संस्थानाकडे आपण पाठविल्यास मी त्यांचा यथायोग्य परामर्श घेईन आणि बौद्ध धर्माची खरी तत्त्वे जनतेत पसरावी म्हणून मला शक्य असेल ते सर्व प्रकारचे साहाय्य त्यांना देईन."
आधुनिक भारतातील पहिला : बडोद्यातील बुद्ध पुतळा

 ३१ डिसेंबर १९१० रोजी सयाजीराव महाराजांनी बडोद्यातील ज्युबिली बागेत बुद्धाचा पुतळा जपानहून आणून बसविला. या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर बौद्ध धर्माची तत्त्वे कोरलेली होती. हा आधुनिक भारतातील बुद्धाचा पहिला पुतळा होता. या

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / ८