पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
बौद्ध धर्म

 बाबासाहेबांनी आधुनिक भारताला बौद्ध धर्म परिचित करून दिला हे आपण जाणतोच. परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या ५८ वर्षे अगोदर सयाजीराव महाराजांनी या क्षेत्रात करून ठेवलेले पायाभूत काम महाराजांच्या इतर कामाप्रमाणेच इतिहासाच्या पोटात गडप झाले आहे. भारताचा सांस्कृतिक इतिहास विचारात घेता यात आश्चर्यकारक असे काहीच नाही. या पार्श्वभूमीवर “महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म” यांच्यातील नाते सांगणारे जे नवे संदर्भ पुढे येत आहेत ते संदर्भ आपले बौद्धिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी फलदायी ठरतील.

 रोमेश चंद्र दत्त यांच्या १८९३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘History of Civilization In Ancient India' या ग्रंथामधील बुद्धासंदर्भातील वृत्तांत वाचून कृष्णराव अर्जुन केळूस्कर यांना 'बुद्धचरित्र' लिहिण्याची प्रेरणा मिळाली होती. याच रोमेश चंद्र दत्त यांना १८९५ मध्ये सयाजीराव महाराजांनी ब्रिटीश

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / ६