Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपकरणांचा वार्षिक खर्च २० ते ३० रु. प्रतिविद्यार्थी इतका होता. एका विद्यार्थ्याला कलाभवनमध्ये शिकण्यासाठी सरासरी ३ ते ४ रु. प्रतिमहिना खर्च येत असल्याचे यातून स्पष्ट होते. या विद्यार्थ्यांना कलाभवनच्या वसतिगृहामध्ये मोफत निवासाची सोय करण्यात आली होती. मुंबई येथील व्हिक्टोरिया ज्युबिली तंत्रज्ञान संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येणारा सरासरी खर्च यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे फेब्रुवारी १९१९ मध्ये प्रकाशित झालेल्या 'The Dawn and Dawn Society's Magazine' 'Progress of Technical Education In Native Indian States - Part V' या लेखात नमूद करण्यात आले आहे. बडोदा सरकारतर्फे कलाभवन व त्याच्याशी संलग्न जिल्हा औद्योगिक शाळांवर दरवर्षी ६०,००० ते ८०,००० रु. इतका खर्च केला जात होता.
आंतरराष्ट्रीय दर्जा
 परदेशातील औद्योगिक शिक्षणाशी भारतीय तंत्र शिक्षणाची तुलना करून भारतात औद्योगिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सयाजीराव म्हणतात, “औद्योगिक शिक्षणाची आवश्यकताही आजच्या घटकेला कमी खास नाही. उद्योगधंद्यांचा विकास करण्याच्या कामी औद्योगिक शिक्षणाचा केवढा प्रचंड उपयोग होतो, हे युरोप- अमेरिकेच्या माझ्या गेल्या सफरीत मला लख्ख दिसून आले. अतिशयोक्ती न करता मी

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / १९