पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तत्कालीन भारतातील बहुसंख्य तांत्रिक संस्थांमध्ये न आढळणाऱ्या सर्व सोयींनीयुक्त प्रयोगशाळा आणि वर्कशॉप्स हे बडोद्यातील कलाभवनचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. कलाभवनमधील अभियांत्रिकी वर्कशॉप्समध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवली होती. या यंत्रसामग्रीची उपयुक्तता आणि गुणवत्ता दरवर्षी अद्ययावत केली जात असे. कलाभवनमधील ही यंत्रसामग्री मशीन शेड, फिटिंग शेड, लेथ शेड अशा विविध विभागांमध्ये ठेवली होती. बडोदा सरकारच्या आरोग्य, महसूल, अभियांत्रिकी, पाणीपुरवठा इ. विविध विभागांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे कलाभवनच्या विविध अभ्यासशाखांच्या वर्कशॉप्समध्ये व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन घेतले जात होते. या विभागांबरोबरच बडोद्यातील गिरण्या व कारखान्यांना लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादनदेखील केले जात असे. बडोदा व बडोद्याबाहेरील खाजगी कारखान्यातील इंजिने, बॉयलर व इतर यंत्रसामग्रीची दुरुस्तीदेखील कलाभवनमध्ये केली जात असे. कलाभवनच्या विविध वर्कशॉप्समध्ये दिल्या जाणाऱ्या या प्रत्यक्ष प्रशिक्षणामुळे विद्यार्थी केवळ सैद्धांतिक ज्ञान न मिळवता भविष्यात व्यावसायिकदृष्ट्या यंत्रसामग्री दुरुस्त करू शकत असत.
 कलाभवनमधील रासायनिक प्रयोगशाळेत जैविक व अजैविक रसायनशास्त्र शिकवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली होती. ही प्रयोगशाळा मुंबई प्रांतातील सर्वोत्तम
महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / १५