पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लक्ष्मीबाई (महाराणी चिमणाबाई पहिल्या) यांचा यादरम्यान १८८५ मध्ये मृत्यू झाला. त्यांची आठवण म्हणून या राजवाड्याला 'लक्ष्मीविलास' हे नाव देण्यात आले.
राजवाड्याची अंतर्गत रचना
 इंडो-सार्सेनिक स्थापत्यशैलीवर आधारलेला लक्ष्मीविलास राजवाड्याचा आराखडा मेजर चार्ल्स मॉन्ट या ब्रिटिश अभियंत्याने तयार केला होता. हा आराखडा तयार करताना राजवाड्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची काळजी मॉन्ट यांनी घेतली होती. चार्ल्स मॉन्ट यांच्या नेतृत्वाखाली राजवाड्याचे बांधकाम चालू असतानाच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर बडोद्याचे इंजिनिअर रॉबर्ट चिस्लो यांना राजवाड्याचे उर्वरित काम सोपवण्यात आले. १७० खोल्या असणारा लक्ष्मीविलास राजवाडा तीन भागांमध्ये विभागण्यात आला होता. पहिल्या भागात दरबार हॉल, डॉक्टरांचे कार्यालय, अभ्यागत कक्ष, बिलियर्ड रूम इ. चा समावेश होता. दुसरा भाग महाराजांसाठी राखीव होता. तर तिसऱ्या भागात महिलांसाठीची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर सयाजीरावांनी आपल्या राजवाड्यामध्ये भारतातील पहिली विजेवर चालणारी लिफ्टदेखील बसवली.
 राजवाड्याच्या दक्षिण भागात मध्यभागी एक कारंज्याचा चौक आहे. बहुतेकदा महाराजांचे वास्तव्य या भागातच असे.

वरच्या मजल्यावर भव्य ग्रंथसंग्रहालय, डायनिंग हॉल, दिवसा

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / ८