पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधिकारी रामचंद्रराव माने-पाटील यांच्या संदर्भातील एक आठवण यादृष्टीने फारच लक्षवेधी आहे. या चर्चेचा शेवट आपण त्या आठवणीने करूया.
 लक्ष्मीविलास राजवाड्याच्या लॉनवर एका सकाळी महाराज कागदपत्र पाहत होते. ते पाहून झाल्यावर तेथून दिसणाऱ्या राजवाड्याकडे बघत जवळच उभ्या असलेल्या रामचंद्रराव माने पाटलांना सयाजीराव म्हणाले, “माने, एखादे वेळी असे वाटते की, एवढा मोठा राजवाडा आम्हाला काय करावयाचा आहे? येथेच एखादा बंगला बांधून आपण त्यात राहावे व या राजवाड्याचे म्युझियम किंवा लायब्ररीत रूपांतर करून आमच्या प्रजेला त्याचा उपयोग करून द्यावा. "

●●●
महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / २२