Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऑफ सायन्समध्ये अध्यापन करणाऱ्या प्रा. कवठेकर यांनी १८९७ मध्ये 'अर्थशास्त्र' हा मराठीतील या विषयावरील पहिला ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्राची मूलतत्त्वे मराठीमधून मांडण्याचा हा पहिला प्रयत्न होता. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना मदत करणे हा अन्योन्य सहकारी मंडळी संस्थेचा मुख्य उद्देश होता.
 १९१५-१६ मध्ये या संस्थेचे एकूण २०० सभासद होते. तर संस्थेचे खेळते भांडवल ४८,९०५ रु. व सभासदांच्या ठेवी ३८,७७५ रु. होत्या. १९१७-१८ दरम्यान अन्योन्य सहकारी मंडळीची सभासद संख्या ३१६ झाली. तर एकूण खेळते भांडवल ७२,५९६ रु. पर्यंत वाढले. अन्योन्य सहकारी मंडळीने केलेल्या सूत्रबद्ध व्यवस्थापनामुळे अल्पावधीतच संस्थेची लक्षणीय प्रगती झाली. १९२३-२४ मध्ये संस्थेची सभासद संख्या ६७९ व खेळते भांडवल १,७८,४८४ रु. पर्यंत वाढले. ही आकडेवारी बडोद्यातील पहिल्या सहकारी संस्थेची सातत्यपूर्ण प्रगती अधोरेखित करते.
व्हाईटनॅक : भारतात आलेला पहिला अमेरिकन अर्थतज्ज्ञ
 १९०६ च्या अमेरिका दौऱ्यात महाराजा सयाजीरावांनी बुकर टी. वॉशिंग्टन आणि राल्फ व्हाईटनॅक यांची भेट घेतली. फिलाडेल्फिया येथील अमेरिकन ब्रिज कंपनीच्या खजिनदारांचे खासगी सचिव म्हणून काम सुरू करण्यापूर्वीच व्हाईटनॅक यांना उद्योग, हस्तकौशल्य, सुतारकाम इ. बाबींचा प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव होता. व्हाईटनॅक यांचे अनुभवाधारित कौशल्य पाहून

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ९