Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मध्ये त्रावणकोर बँकेचे 'स्टेट बँक ऑफ त्रावणकोर मध्ये रूपांतर करण्यात आले. परंतु १९५३ पासून जगभरातील विविध देशांमध्ये आपल्या शाखा सुरू करणाऱ्या बँक ऑफ बडोदाला या योजनेतून वगळण्यात आले. त्यामुळे बडोदा बँकेची स्वतंत्र ओळख कायम राहिली.
 जून २०१४ मध्ये बँक ऑफ म्हैसूरच्या एकूण ९७६ शाखा कार्यरत होत्या. यापैकी ७९% शाखा (७७२) या एकट्या कर्नाटक राज्यात कार्यरत होत्या. याउलट बँक ऑफ बडोदाच्या संस्थानाबाहेर भारत आणि जगभरातील विस्ताराचे सप्रमाण विवेचन याआधीच्या विश्लेषणामध्ये केले आहे. तर मार्च २०१५ मध्ये भारतातील १८ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या १,१५७ शाखा कार्यरत होत्या. या पार्श्वभूमीवर समकालीन प्रगत संस्थानातील बँकांपैकी बँक ऑफ बडोदा ही जगभर विस्तारलेली एकमेव बँक ठरते.
 १५ फेब्रुवारी २०१७ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्टेट बँक ऑफ त्रावणकोरसह अन्य ४ बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३१ मार्च २०१७ रोजी या ५ बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आल्या. याउलट १७ सप्टेंबर २०१८ रोजी भारत सरकारने आर्थिक अडचणीत सापडलेल्या विजया बँक आणि देना बँक या दोन बँका वाचवण्यासाठी त्या बँक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला. या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ४३