पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोझांबिक आणि कतार या देशात विविध ठिकाणी शाखा सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्याची बडोदा बँकेला प्रतीक्षा आहे. तर भविष्यात ब्रिटन, युनायटेड अरब अमिरात आणि बोटस्वाना या देशांमध्ये आपला व्यवसाय विस्तारण्याचे बडोदा बँकेचे उद्दिष्ट आहे.
 आजची बँक ऑफ बडोदाची आंतरराष्ट्रीय घोडदौड पाहता महाराजा सयाजीरावांनी आपला देश आणि समाज जागतिक स्पर्धेत टिकून जगातील प्रतिष्ठित राष्ट्रांच्या पंगतीत बसला पाहिजे हे १२० वर्षांपूर्वी ठेवलेले ध्येय बँकिंग क्षेत्रात पूर्णत्वाकडे जाताना दिसते.
बँक ऑफ बडोदा आणि इतर समकालीन संस्थानांच्या बँका
 बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेवेळी बडोद्याबरोबरच म्हैसूर आणि त्रावणकोर ही संस्थाने भारतातील सर्वांत प्रगत संस्थाने म्हणून ओळखली जात होती. या पार्श्वभूमीवर म्हैसूर आणि त्रावणकोरमधील बँकांच्या वाटचालीचा बडोदा बँकेच्या संदर्भात तुलनात्मक आढावा घेणे उचित ठरेल. म्हैसूरचे महाराजा कृष्णराज वाडियार यांनी संस्थानच्या आर्थिक विकासाचा आढावा घेण्यासाठी एम. विश्वेश्वरय्या यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती केली. या समितीच्या शिफारशीनुसार बडोदा बँकेच्या स्थापनेनंतर ५ वर्षांनी १९ मे १९१३ रोजी म्हैसूरचे महाराजा कृष्ण राज वाडियार यांनी बँक ऑफ म्हैसूरची स्थापना

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ४१