Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाण्याच्या इच्छेने ही नोकरी स्वीकारल्या'चे व्हाईटनॅक यांनी नोंदवले आहे. याच पत्रात व्हाईटनॅक यांनी 'बडोदा सरकारचे आर्थिक सल्लागार' अशी आपली पदनिश्चिती करण्याबरोबरच सेवेचा कालावधी दोन वर्षापेक्षा अधिक आणि चार वर्षांपेक्षा कमी ठरवावा अशी विनंती केली. त्यांच्या या दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या.
 बडोदा संस्थानातील कमकुव बँकिंग जाळे मजबूत करून उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी व्हाईटनॅक यांनी मांडलेल्या प्रस्तावित 'People's Bank of Baroda' च्या मसुद्याला पाठिबा दिला. याच दरम्यान बडोद्यात बँक ऑफ मुंबईच्या शाखा उघडण्याचे धोरण ठरवण्यात येत होते. बँक ऑफ मुंबईच्या शाखा बडोद्यात स्थापन झाल्यास बडोद्यातील आर्थिक ठेवी मुंबईला जाऊन त्याचा आर्थिक फायदा बडोद्याऐवजी मुंबईला होण्याची भीती उद्योजकांना वाटत होती. यावर मात करण्यासाठी सयाजीराव महाराजांनी व्हाईटनॅक यांच्या नेतृत्वाखाली बँक ऑफ बडोदाची स्थापना केली. बँक ऑफ बडोदाची स्थापना करत असताना व्हाईटनॅक यांनी खासगी पतसंस्था चालवणारे भांडवलदार, शासन आणि अन्य इच्छुक व्यक्तींमध्ये संवाद निर्माण केला.
 बँकेच्या स्थापनेसाठी बडोदा सरकारने २,५०,००० रु. ठेवीची गुंतवणूक केली. या ठेवीबरोबरच वार्षिक ४ % व्याजदराने १५ वर्षांसाठी ७,५०,००० रु. रक्कमदेखील सरकारकडून उपलब्ध

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ११