Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मागणी करत होते; परंतु प्रत्यक्षात सुधारणेचे कायदे करून त्यानुसार अंमलबजावणी सयाजीराव महाराज करत होते.

 सयाजीराव महाराजांचा जन्म हिंदू धर्मात झाला म्हणून त्यातीलच सुधारणांकडे त्यांचे लक्ष होते,असे म्हणणे एकांगी ठरेल.इतर धर्मांबाबत त्यांचे धोरण सहिष्णुतेचे होते.बौद्ध धर्माच्या उन्नतीमध्ये सयाजीराव महाराजांचा मोठा हातभार होता.धर्मानंद कोसंबींना पहिल्या भेटीत १६० रुपये दिले.इ.स. १९०८ ते इ.स. १९९१ या कालावधीत बौद्धधर्माचा महाराष्ट्रात प्रसार आणि ग्रंथलेखनासाठी दरमहा ५० रु.शिष्यवृत्ती दिली.कोसबींची बौद्ध धर्मावरील पाच व्याख्याने बडोद्यात आयोजित केली.फर्ग्युसन महाविद्यालयात धर्मानंद कोसंबीच्या विनंतीनुसार पाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला पंधरा आणि दहा रुपयांच्या प्रत्येकी दोन शिष्यवृत्ती सुरू केल्या.इ.स. १९१० मधील आठव्या जगप्रवासात महाराज जपानमधील याकोहामा येथे पोहोचल्यावर कामाकुरा आणि इनोसिमा येथील बौद्ध मंदिरांना आणि बौद्ध गुफांना भेटी दिल्या.जपानच्या जुन्या राजधानीचे शहर किताओला (kioto) मधील विद्यापीठ आणि खासकरून बुद्धांची शिकवणूक देणाऱ्या शाळांना भेटी दिल्या.बौद्ध धर्माचे विश्वरूप समजून घेतले.परत येताच ज्युबिली बागेमध्ये जपानहून आणलेल्या गौतम बुद्धांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.यावेळी 'जेव्हा तुमची नजर या मूर्तीकडे जाईल, तेव्हा महात्मा बुद्धांचे उच्च गुण व विचार कसे होते, याचा विचार

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / १४