पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४७) सुभा अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पूर्व नवसारी जिल्ह्यासाठी तगाईची आगाऊ रक्कम म्हणून ३०,००० रु. मंजूर केल्याचा आदेश. संपूर्ण राज्यातील नवीन विहिरींसाठी आधीच मंजूर केलेल्या २५,००० रुपयांच्या सर्वसाधारण निधीला जोडून ही रक्कम देण्यात आली.
४८) नवसारी जिल्ह्यातील दुष्काळात दारिद्र्याने ग्रासलेले अनेक प्रतिष्ठित लोक कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या भावनेमुळे दुष्काळी कामांवर जात नव्हते. या लोकांची उपासमार होऊ नये आणि त्यांचा उदरनिर्वाह चालावा या हेतूने त्यांच्यासाठी १५,००० रु. तगाईची आगाऊ रक्कम देण्याचा आदेश. याशिवाय गवत खरेदीसाठी १५,००० रु.ची अतिरिक्त तगाई मंजूर केली.
रणांगणावरील सैनिक
दुष्काळासारख्या आपत्तीच्या वेळी राजवाड्यातून 'आदेश' न काढता संस्थानचा प्रसंगी पायी, घोड्यावरून दौरा करणाऱ्या सयाजीरावांनी संस्थानातील शेतकरी, विकलांग व्यक्ती, नवजात बालके, कारागृहातील कैदी आणि कामगार इ. समाजघटकांना 'जगवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या परिस्थितीतदेखील भिकारी व्यक्तींची संख्या कमी करण्यासाठी धडपडणाऱ्या या द्रष्ट्या राजाने धनका, चोंधार, नाईकदास, भिल्ल, कोकणी आणि कालीपरज आदिवासी जमातींचेदेखील उत्तम 'संगोपन' केले. शेतसाऱ्यात सवलत देणारे सयाजीराव मोबदल्याच्या

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / २३