पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या भाषणात पुढे महाराज मानवी जीवनातील विशिष्ट कालखंडानंतर येणाऱ्या आपत्तींबाबत आपली भूमिका काय असायला पाहिजे याबाबत इशारा देताना म्हणतात, "सर्वात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल त्यांनी हे उचलायला हवे की त्यांनी आपल्यावर ओढवलेल्या आपत्तीची कारणे मनावर कोरून ठेवायला हवीत आणि हे तपासायला हवे की आपल्या वाट्याला आलेला भोग आपल्या कमतरतांची स्वाभाविक निष्पत्ती आहे. की यात संस्था दोषी आहेत की इतरांनी कृत्रिमरीत्या हे सर्व निर्माण केलेले आहे."

 या भाषणात महाराज आपल्या भूमिकेमागील पार्श्वभूमी स्पष्ट करताना म्हणतात की, “...केवळ दुष्काळाविषयी माझे व्यक्तिगत आकलन आणि निवारणासाठी केलेल्या उपाययोजना मांडणे एवढाच माझा उद्देश आहे." आपत्ती व्यवस्थापनाच्या महाराजांच्या कार्याचे सार सांगायचे झाल्यास संस्थानी प्रशासन, समाजातील दानशूर लोक आणि आपत्तीग्रस्त सर्वसामान्य लोक यांच्यातील संवादी, सहभागी आणि सर्वसमावेशक एकोप्यातून आपत्ती व्यवस्थापन असेच त्याचे स्वरूप होते. दुष्काळी कामांमध्ये धरणे, रेल्वे, रस्ते, तलाव, विहिरी यासारख्या कामांबरोबरच महाराजांनी एक जगावेगळे काम पाटण येथील अनहिलवाडा या प्राचीन शहराच्या इतिहासावर आणि प्राचीन अवशेषांवर प्रकाश पडावा या उद्देशाने या अवशेषांच्या उत्खननाचे काम दुष्काळी

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / १२