इंग्लंड दौरा
दादासाहेबांनी इ.स. १९९४ मध्ये पुन्हा इंग्लंडला प्रयाण केले. या वास्तव्यात त्यांनी निर्मिती केलेले चित्रपटही तेथील निर्मात्यांना दाखवले. या चित्रपटांतील दादासाहेबांच्या तांत्रिक अंगांचे परदेशातही खूप कौतुक झाले. इंग्लंडहून परतल्यावर पुढील दोन वर्षांत दादासाहेबांनी आगकाड्यांची मौज, नाशिक- त्र्यंबक येथील देखावे, तळेगाव काचकारखाना, केल्फाच्या जादू, लक्ष्मीचा गालिचा, धूम्रपान लीला, सिंहस्थ पर्वणी, चित्रपट कसा तयार करतात, कार्तिक पूर्णिमा उत्सव, धांदल भटजीचे गंगास्नान, संलग्न रस, स्वप्नविहार हे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट तयार केले. त्यामुळे अनुबोधपटांच्या जनकत्वाचा मानही त्यांच्याकडेच जातो. इ.स. १९१७ मध्ये त्यांनी लंकादहन हा चित्रपट प्रदर्शित केला. शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा इत्यादींच्या आर्थिक साहाय्याने ५ लाख रुपये भांडवल उभे करून 'फाळकेज फिल्म लिमिटेड' ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली; परंतु ती कार्यान्वित झाली नाही. तथापि कोहीनूर मिल्सचे वामन आपटे, माया भट्ट, माधवजी जयसिंग व गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत १ जानेवारी १९१८ रोजी 'फाळकेज फिल्मस'चे रूपांतर त्यांनी 'हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी' मध्ये केले. त्याच वेळी त्यांच्या कल्पनेत १९१४ पासून असलेले कायमचे चित्रपटनिर्मितीगृहही नासिक येथे त्यांनी उभारले. या संस्थेद्वारे दादासाहेबांनी दिग्दर्शन