पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्याचे दिसते. या परदेश प्रवासात इंडिया ऑफिसने कॅप्टन इव्हान्स गॉर्डन यांची राजकीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली. ब्रिटीश प्रशासनाची ही कृती महाराजांना आवडली नाही. महाराज आरोग्यावर उपचार करून घेत असताना असा राजकीय अधिकारी आणि त्याचा खर्च अनावश्यक आहे ही महाराजांची भूमिका होती. या दौऱ्यात महाराजांची चिडचिड वाढली होती. महाराजांचा बहुतांश वेळ वाचनात जात असे. बडोद्याच्या काळजीने ते बेजार होत. याच दौऱ्यात महाराजांनी अरविंद घोष ज्यांना महाराज 'बाबू फ्रेंड' म्हणून बोलावत असत त्यांना महसूल विभागात मानाचे स्थान आणि अधिकारी पद देऊन त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी अधिकारी देण्याचे आदेश दिले. याच दौऱ्यात सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या गरजेपेक्षा जास्त आहे त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो त्यामुळे ही कर्मचारी संख्या कमी करण्याचा निर्णय महाराज घेतात. याच दौऱ्यात महाराजांनी बडोद्यातून सक्तीचे शिक्षण, दोन तलावांची योजना आणि इतर काही महत्वाच्या प्रकरणांची माहिती मागविली. फेलिसी या शिल्पकाराचा बडोद्यातील कार्यकाल संपण्यापूर्वी त्यांच्याकडून पुढील लोकांचे अर्धपुतळे करून घेण्याची इच्छा महाराजांनी व्यक्त केली. १. राणीसाहेब जमनाबाई, २. राधाबाईसाहेब, ३. पार्वतीबाईसाहेब, ४. काझी शहाबुद्दीन, ५. रावबहादूर जगन्नाथ लक्ष्मण, ६. दिवाणसाहेब, ७. बाबूराव बाबा, ८. रेऊसाहेब व ९. मि. इलियट.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ३५