पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांनी लिहिलेले पत्र फारच बोलके आहे. या पत्रात महाराज लिहितात, 'ब्रिटनमध्ये नियुक्त केलेल्या राजकीय अधिकाऱ्यांनी प्रवासी भारतीय राजांना मदत करणे अपेक्षित आहे; पण अशा प्रवासी राजांना हे माहीत नसते की, त्या अधिकाऱ्याची मदत कोणत्या संदर्भात घ्यायची आहे. या अज्ञानापोटी हे राजे सगळ्याच गोष्टी विचारून करायला लागतात. मग काही गोष्टी या तो अधिकारी कसा आहे, त्याचे विचार व चारित्र्य कसे आहे यावर अवलंबून राहतात. काही अधिकारी राजांच्या खासगी बाबींमध्येही लक्ष घालतात जे अयोग्य आहे. काही अधिकारी राजांकडून प्रत्येक गोष्टीची, उपक्रमांची बारीकसारीक माहिती मागवतात, जे प्रत्येकवेळी शक्य नसते.' या पत्रात एक सार्वभौम राजा म्हणून ब्रिटीश साम्राज्यात सयाजीरावांचे असणारे स्वतंत्र अस्तित्व महाराज ब्रिटीश अधिकाऱ्यांना वारंवार लक्षात आणून देत होते. या दौऱ्यात महाराजांनी ट्रिस्ट, व्हिएन्ना, पॅरीस, सेंट मॉरीज, ल्युक्रेन, रोम्सडल व्हॅली, नॉर्थ केप, नॉर्वे इ. ठिकाणांना महाराजांनी भेटी दिल्या.

 या दौऱ्यात महाराजांना कार्लसबड या ठिकाणी राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. कारण तेथील वसंत ऋतू महाराजांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरणार होता. या दौऱ्यात युरोपमध्ये येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी ऑस्ट्रियन लॉयड्स सारख्या कमी खर्चाच्या जहाजाने येणे जाणे करावे, युरोपियन ट्रीपच्या संदर्भात एक नियमावली तयार करावी असे आदेश काढले. या परदेश दौऱ्यात महाराजांनी प्रांची प्रभात विवाद, मुंबई येथील हिंदू

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ३३