पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंसेविरोधातील कायदा, राज्याच्या वेगळ्या कार्यालयांच्या नामकरणाबाबतची समिती, डॉ. धुरंधर यांची स्वच्छता आयुक्त म्हणून नियुक्ती, युरोपच्या धर्तीवर उद्यानांची निर्मिती, अकार्यक्षम अधिकाऱ्यांना कमी करणे, कोणतेही काम करता जाती- धर्माचा विचार करू नये, मौलाबक्षच्या मुलास युरोपियन संगीत शिकण्यासाठी युरोपला पाठवावे, खाजगी धर्मादायासंदर्भात माहिती जमा करणे, शैक्षणिक तपासणी समिती इ. आदेश तिसऱ्या दौऱ्यातून महाराजांनी काढले. हे सर्व आदेश पाहिले असता आपल्या राज्याच्या सर्वांगीण उन्नतीचा संतुलित विचार हा राजा कसा करत होता हे ध्यानात येईल.

 तिसऱ्या परदेश प्रवासानंतर महाराज ४ महिने संस्थानात होते. तिसऱ्या दौऱ्याहून आल्या आल्या लगेच त्यांनी आपल्या राज्याचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यानंतर परत आल्यानंतर लगेच महाराजांनी जानेवारी १८९३ मध्ये १४ महत्वाचे आदेश काढले. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते.

 १. आदेशाबाबतच्या सर्व प्रकारणांमध्ये मराठी अथवा गुजरातीचा वापर व्हावा. २. कृषीतज्ञांसाठी ३ लाखांचे अग्रीम अनुदान मान्य केले. ३. हर्राशी समिती नेमून देण्यात आली व त्या समितीच्या अधिकारांची व्याख्या करण्यात आली. ४. महाराजांसमोर आणल्या जाणाऱ्या प्रकरणांबाबत नियामक संकेत तयार करण्यात आले. ५. खटला, लवादासाठी आलेल्या लोकांना थांबण्यासाठी वेगळा मंडप उभारण्यात यावा. ६.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ३१