पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २०० हून अधिक हुजुर हुकूम काढले. १८८७ ते १९०६ या १९ वर्षांत एकूण ६ परदेश प्रवास झाले. या ६ दौऱ्यांमध्ये १९१ हुजूर - हुकुम काढले गेले. हा कालावधी बडोद्याच्या क्रांतिकारक विकासाचा पायाभूत कालखंड होता हे या हुजुर हुकुमांच्या विषय-आशयावरून स्पष्ट होते. हे हुजुर-हुकूम मुख्यतः शिक्षण, शेती, उद्योग, ग्रंथ प्रकाशन, धर्म, आरोग्य, प्रशासकीय सुधारणा, राजकीय सुधारणा इ. शी संबंधित होते.

 यावरून महाराजांची आपल्या राज्यकारभारावर किती बारीक नजर होती हे तर स्पष्ट होते. त्याचप्रमाणे आपल्या राज्याच्या विकासासाठी आपल्या परदेश वाऱ्यांचा किती परिणामकारकपणे उपयोग महाराजांनी करून घेतला होता हेसुद्धा सिद्ध होते. सर्वात महत्वाचे म्हणजे महाराजांच्या आरोग्याची स्थिती किती त्रासदायक होती हेही कळते. थोडक्यात महाराजांचे समकालीन इतर राजे परदेशात जाऊन मौजमजा करत असतानाच्या पार्श्वभूमीवर तर महाराज किती आदर्श राज्यकर्ते होते ही यातून अधोरेखित होते.

परदेश प्रवास : महाराजांचा दृष्टीकोन

 जुलै १८८४ मध्ये बापूसाहेब घाडग्यांच्या गार्डियनशिपखाली संपतराव गायकवाड आणि खासेराव जाधव शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. खासेरावांना शेतीच्या शिक्षणासाठी तर संपतरावांना बॅरीस्टर आणि मिलिटरी शिक्षणासाठी महाराजांनी इंग्लंडला पाठवले. महाराजांमध्ये युरोपबद्दलचे

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / १०