पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
गंगारामभाऊ म्हस्के

 १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात महात्मा फुल्यांचे एक सहकारी आणि सत्यशोधक चळवळीचे हितचिंतक आणि पाठीराखे गंगारामभाऊ म्हस्के यांनी मराठा जातीतील शिक्षण प्रसाराच्या चळवळीचा पाया घातला. महात्मा फुल्यांनी शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या शिक्षणाचा आग्रह धराला. याचवेळी सयाजीराव गायकवाडांनी आपल्या बडोदा संस्थानात फुल्यांना अपेक्षित कामाची उभारणी फुले संकल्पित धोरणाच्या पुढे जाऊन केली. महत्त्वाचे म्हणजे सयाजीरावांनी आपली मातृभूमी असणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला सर्वाधिक योगदान दिले. त्याचप्रमाणे मराठ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी १५० कोटींहून अधिक रक्कम खर्च केली. गंगारामभाऊंच्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनला स्थापनेपासून पुढे सलग ५४ वर्षे आर्थिक पाठबळ दिले. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या गरीब मराठ्यांना शिष्यवृत्ती देऊन एक ऐतिहासिक काम उभे

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ६