पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चळवळींमधील अंतर्विरोध आणि संवाद या दोन्ही बाबी आपल्या दृष्टीकक्षेत आल्या नाहीत. म्हणूनच सयाजीरावांच्या निमित्ताने आपला इतिहास जोडून समजून घेण्याची संस्कृती विकसित झाली तर ती आपल्या भविष्यातील वाटचालीला उपयुक्त ठरेल. सयाजीरावांप्रमाणे खासेरावांची जन्मभूमी महाराष्ट्र होती तर कर्मभूमी बडोदा होती. दोघांनीही आपल्या जन्मभूमीशी आपले नाते आयुष्यभर जपले आणि या जन्मभूमीच्या उत्कर्षाला प्रत्येक टप्प्यावर हातभार लावला. त्यामुळेच आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या यादीत महाराष्ट्राला खासेरावांना सन्मानाचे स्थान द्यावे लागेल.

●●●
महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २९