पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रशिक्षण घेऊन परत आल्यानंतर माधवरावांनी बडोद्यात विश्वासू अधिकाऱ्यांच्या मदतीने क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्याचे केंद्र सुरू करण्याची योजना अरविंद घोष आणि खासेरावांनी आखली.
प्रशासक खासेराव
 १९०९ ला खासेराव जाथव मेहसाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. खासेरावांच्या प्रेरणेने नरसिंहभाई पटेल यांनी गावातील शिक्षक प्रेसमध्ये 'मुक्ति कोन पथे' या बंगाली क्रांतिकारी पुस्तकाचा गुजराती अनुवाद छापला. यापूर्वी नरसिंहभाईनी क्रांतिकारी गॅरिबाल्डीचे चरित्रही छापले होते. दुसऱ्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर 'वनस्पती' असे शीर्षक आणि आत मात्र बॉम्ब कसे तयार करावे याची माहिती दिली होती. राष्ट्रवादाची प्रेरणा देणारी ही सर्व पुस्तके इंग्रज पोलिस अधिकाऱ्यांनी जप्त केली. खासेरावांनी त्या इंग्रज पोलिस अधिकाऱ्यांना, बडोदा सरकारच्या हद्दीत छापा टाकायला तुम्हाला कोणी परवानगी दिली? अशा कडक शब्दात खडसावले आणि योग्य ती कारवाई करण्याचा संदेशही दिला. यासंदर्भात सयाजीरावांनी गव्हर्नरकडे कडक तक्रार केली. याला उत्तर म्हणून गव्हर्नरकडून सयाजीराव महाराजांना दिलगिरीचे पत्र आले.

 केशवराव देशपांडे आणि खासेराव जाधव हे महाराजांचे दोन्ही कलेक्टर राजद्रोही चळवळीच्या लोकांना संरक्षण देतात, त्यांच्याविरुद्ध महाराजांनी चौकशी करावी म्हणून गव्हर्नर आणि

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / १५