पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
कृष्णराव अर्जुन केळुसकर

 बहुजनांच्या इतिहासातील 'शापित' महात्म्यांच्या यादीतील महाराजा सयाजीराव, गंगारामभाऊ म्हस्के, खासेराव जाधव, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याप्रमाणेच कृष्णराव अर्जुन केळुसकर हेसुद्धा बहुजन प्रबोधनाचे नायक झाले नाहीत. आपल्या व्यक्तिपूजक समाजात 'शिवराय - फुले- शाहू-आंबेडकर' ही चौकट अकारण आपण निर्माण केली. कारण त्यामुळे शिवरायांपासून आंबेडकरांपर्यंत समाजपरिवर्तक परंपरेतील असंख्य दुवे अलक्षित राहिले. याचा नकारात्मक परिणाम आज आपण अनुभवत आहोत. आजच्या मराठा आरक्षणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विचार करता आरक्षण आंदोलनाने फक्त राजर्षी शाहू नायक म्हणून स्वीकारले. परंतु महाराजा सयाजीराव, गंगारामभाऊ म्हस्के, खासेराव जाधव यांचे मराठ्यांच्या उत्कर्षातील योगदान शाहू कार्याच्या अगोदरचे आणि शाहू कार्यापेक्षा कितीतरी भरीव असूनसुद्धा त्याची.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ६