पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केला होता हेही उल्लेखनीय आहे. यासंदर्भात कीर म्हणतात, “बडोद्याच्या महाराजांनी गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांना काही मासिक वेतन द्यावे असे एक विनंती पत्रक त्यांनी बडोद्याच्या महाराजांकडे सादर केले." बाबासाहेब आणि केळुसकर या दोघांमध्ये आंबेडकरांच्या शालेय जीवनात तयार झालेले नाते केळुसकरांच्या मृत्यूपर्यंत टिकून होते हेच यावरून लक्षात येते. त्याचप्रमाणे केळुसकरांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा बाबासाहेबांना सयाजीरावांची आठवण होते हेसुद्धा 'लक्षवेधी' आहे. परंतु केळुसकरांच्या आत्मचरित्रात १९३२ मध्ये स्वतः केळुसकरांनी त्यांच्या आर्थिकस्थितीविषयी महाराजांना पत्र लिहून मदतीसंदर्भात विनंती केली असल्याचे दिसते. या पत्राला अनुसरून महाराजांनी एका पुस्तकाचे काम करण्याविषयी विचारणाकेळुसकरांना केली होती. परंतु त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना ते करता आले नाही. त्यामुळे १९३० ते केळुसकरांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९३४ पर्यंतच्या सर्व घटना जोडून व घेता किरांचे हे मत तपासून घ्यावे लागते.
 कारण केळुसकरांपासून हाकेच्या अंतरावर राहणारे बाबासाहेब केळुसकरांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना भेटायला गेले नाहीत. १९३४ ला केळुसकरांचा मृत्यू झाला त्यावेळी केळुसकरांच्या अंत्यविधीला हजर राहणे, कुटुंबीयांची सांत्वन भेट किंवा केळुसकरांवरील मृत्युलेख यापैकी कोणतीही कृती बाबासाहेबांकडून का झाली नसावी हा एक मोठा प्रश्नच आहे. याबरोबरच २१ मे १९४६ रोजी बाबासाहेबांच्या दिल्लीच्या पत्त्यावरून सयाजीराव महाराजांचे नातू प्रतापसिंह महाराजांना

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ४७