पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथकारांमध्ये गणना होण्याचा योग आणून दिला. थोर महाराजांचा मी आमरण आभारी झालो.”
 धामणस्करांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केळुसकरांनी त्यांचे चरित्र लिहिण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी धामणस्करांशी चर्चा करताना त्यांच्या पूर्वायुष्याची माहिती मिळवली. त्याआधारे केळुसकरांनी धामणस्करांचे ८० पानांचे चरित्र लिहून काढले. हे चरित्र त्यांनी बडोद्यातील भेटीत धामणस्करांना वाचून दाखवून त्यांच्या सूचनेप्रमाणे बदल केले. त्यानंतर त्यांनी धामणस्करांचे हे आजवरचे एकमेव चरित्र १९०२ मध्ये छापून प्रसिद्ध केले. विशेष बाब म्हणजे धामणस्करांना या चरित्राचा खर्च केळुसकरांकडून घ्यायचा नसल्यामुळे त्यांनी या पुस्तकाच्या छपाईचा खर्च परस्पर छापखान्यात पाठवून दिला. पुढे केळुसकरांच्या आजारपणा धामणस्करांनी त्यांच्या उपचारासाठी गणपतराव तिवेकर यांच्याकरवी १०० रु. ची मदत पाठवली.
खासेराव जाधव आणि केळुसकर
 केळुसकरलिखित शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या २०० प्रती विकत घेऊन सयाजीराव महाराजांनी त्यांना आर्थिक साहाय्य केले होते. १९२१ मध्ये प्रा. ताकाखान यांनी केळुसकरांच्या या शिवचरित्राचा इंग्रजी अनुवाद केला. या इंग्रजी अनुवादाच्या छपाईसाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी सयाजीरावांचे नातेवाईक आणि विश्वासू अधिकारी खासेराव जाधव यांनी मोलाची मदत केली. खासेरावांच्या मुंबई दौऱ्यात केळुसकरांनी

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ४३