बडोद्यातील वस्त्रोद्योग
१८८२ मध्ये नवउद्योजकांना उद्योग स्थापन करण्यासाठी उत्तेजन देण्याकरता बडोदा येथे टी. माधवराव यांनी सूत विणकाम कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला. हा बडोदा संस्थानातर्फे सुरू केलेला पहिला औद्योगिक उपक्रम होता. या कारखान्याच्या मुख्य व साहाय्यक इमारतींची एकूण किंमत १ लाख ७९ हजार ५०० रु. आणि यंत्रसामग्री व इमारतीची रक्कम ३ लाख ६३ हजार रु. इतकी होती. या कापड गिरणीमुळे आसपासच्या ३-४ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला. मजुरी करणाऱ्या वर्गातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि संस्थानाला या व्यापाराचा फायदा मिळवून देणे हे कारखाना स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट होते. अल्पावधीतच का गिरणी उद्योगाचे महत्त्व सर्वत्र पसरले आणि बरेच खाजगी उद्योजक गिरण्या स्थापन करण्यासाठी पुढे आले. आपला उद्देश संपन्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुढे ही कापड गिरणी खासगी गुंतवणूकदारांना ५ लाख रुपयांना विकण्यात आली. अशा पद्धतीने बडोद्यातील पहिल्या कापड गिरणीची सुरुवात व तिची पुढील वाटचाल झाली.
पुढे १८९३ मध्ये कापसावर प्रक्रिया करणाऱ्या सूतकताई व विणकाम कारखान्याची सुरुवात केली. यामुळे कापूस उद्योगाचे विशेष महत्त्व वाढले आणि काही खाजगी गिरणी सुरू केल्या