पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करू शकत असल्याचे मत महाराजांनी मांडले. महाराजांचे हे मत आज गलितगात्र झालेल्या मराठा जातीने समजून घेतले तर मराठ्यांसाठी ती 'संजीवनी' ठरेल. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी रखमाबाई गायकवाड यांनी 'स्त्री शिक्षणाची आवश्यकता' हा निबंध श्रोत्यांपुढे स्वतः अस्खलितपणे वाचून दाखवला.

चौथे अधिवेशन - १९१०

 अमरावती अधिवेशनात झालेल्या निर्णयानुसार अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे चौथे अधिवेशन २७-२८ डिसेंबर १९१० या कालावधीत बडोद्यातील इंदुमती महालात भरवण्यात आले. या परिषदेचे अध्यक्षस्थान मालेगावचे सरदार शंभूसिंहजी अमरसिंहजी जाधव यांनी भूषवले. तर स्वागताध्यक्षपदी संपतराव गायकवाड यांची निवड करण्यात आली. या अधिवेशनास सयाजीराव महाराजांसह बडोद्यातील राजपुत्र धैर्यशीलराव, काशीराव जाधव, जनरल नानासाहेब शिंदे, विद्याधिकारी मसानी, सरदार दादासाहेब माने इ. मान्यवर उपस्थित होते.

 या परिषदेमध्ये मराठा समाजाच्या शिक्षणासाठी एक जनरल फंड तयार करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला. या मराठा जनरल फंडासाठी सयाजीराव महाराजांनी १,२५,००० रुपयांची देणगी दिली. तर सयाजीरावांच्या पत्नी महाराणी चिमणाबाईंनी मराठा मुलींच्या शिक्षणासाठी १ लाख रु. ची स्वतंत्र रक्कम दिली. बडोद्याचे माजी दिवाण कै. रा. वि.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २२