पान:महाभारत.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० नरहरिकृत। [द्रोणपर्व जातसें.' ।। १८ ।। तेची आठवण वारंवार । वावरे हृदयीं राया! घोर । तुझे आज्ञेचा मी किंकर । शिरसा मान्य, नरवयों ! ॥ १९ ॥ ऐसें वदोनी पाकशासनी । जाता जाहला निर्भय मनीं । मातें वोपिलें तुमच्या चरणीं । रक्षणार्थ, नवर्या !” ॥ ५० ॥ वदोनी ऐसे मधुर वाणी । विचार करी अंतःकरणीं । ‘माझिया गुरूचा गुरु हा झणी । मज मान्य तैसाची. ॥ ५१ ॥ पढती वदे धर्मराजा । ‘मी जातसे कंदना पैजा । तव रक्षणाची महाराजा ! । वावरे चिंता मानसी.' ।। ५२ ॥ धर्म म्हणे, ‘बाळका! गुणी ! । पर्याप्त भीमभैमी कदनीं । अमित राजयांची श्रेणी । मदर्थी प्राण त्यागिती. ॥ ५३ ॥ यांहींवरी पार्षदै । द्रोणनिधना प्रगटसी द्वंद्व । हवनीं तोषतां जातवेद । प्रसाद वोपी नृपालें. ॥ ५४ ॥ सहित अश्व रथ सारथी । धनु कवच हॉटकदीप्ती । प्रद्युम्ना कुमारव्यक्ती । अर्पिती प्रीती द्रुपदाते. ॥ ५५ ॥ देवदत्त यादवा ! वीर!। वाव होय ? अगा चतुरा! । प्रभिन्न द्विपमदाच्या धारा । स्रवतां सिंहा मर्दिजे ? ॥ ५६ ॥ ना ते तृणाचे अमित भार । अग्नि विझे तयाच्या भारें । की कृष्णानदीच्या पूरें । बाहोनी जाय श्रीशैल ? ॥ ५७ ॥ तयापरी आमुची चिंता । न करी, साह्या जाईजे पार्था । यमसदनीं जयद्रथा । वोपोनी, येई पार्थासीं. ॥ ५८ ॥ तुष्टमान शिनिप्रवीर । मंगळस्नान करुनी रुचिर । परिधान दिव्य पीतांबर । भाळी केशर सुरेख. ॥ ५९ ॥ आंगीं श्रीचंदनाची उटी । मुक्तमाळा शोभती कंठीं । ऋषिवरांची महादाटी । पूजी तुष्टी सद्भावें. ॥ ६० ॥ गंध, अक्षता, सुमनमाळा । अनेक खाद्य वोपिलें फळा । विडे अपेनियां सकळां । भूरिदाने गौरवी. ॥ ६१ ॥ स्वीकारुनी वस्त्राभरण । कैलातक मधु करी पान । करोनी ब्राह्मणा अभिवंदन । ‘जयोस्तु' म्हणती सर्वही. ॥ ६२ ॥ सुमित्र सारथी दारुकबंधु । मातलीतुल्य प्रतापसिंधु । रथ १. इंद्रपुत्र (अर्जुन). २. पुरेसे, समर्थ. ३. पृषतकुलोत्पन्न धृष्टद्युम्न. दुपदराजा व द्रोणाचार्य हे गुरुबंधु. द्रुपद राज्यावर बसल्यानंतर द्रोणाचार्य त्याच्या भेटीकरितां गेले असतां द्रुपदानें आचायची भेट घेतली नाही. यामुळे आचार्यांनी अर्जुनाकडून द्रुपदाचा पराभव करवून, आपणापाशी बांधून आणविलें व अर्धे राज्य घेऊन त्यास सोडून दिले. या अपमानाचा सूड उगविण्याकरिता द्रुपदाने यज्ञयाग करून आचार्यांस मारणारा पुत्र अग्नीजवळ मागितला-अशी कथा आहे. ४. अग्नि. ५. सुवर्णाप्रमाणे तेजस्वी. ६. व्यर्थ. ७. अर्जुनासह. ८. पुष्कळ दक्षिणा देऊन. ९. मूळांत असे आहे:-‘तातः स मधुपर्कार्हः पीत्वा कैलातकं मधु । लोहिताक्षो वमौ तत्र मदविव्हललोचन: ।।' (अध्याय ११२।६२). पुढे अध्याय २१ ओंवी १२५पहा. १०. दारुकाच्या बंधूचें नांव सूत' होते, असे मूळावरून वाटते. (अध्याय ११२ श्लोक ५९ पहा). ११. मातली हा इंद्राचा सारथी,