पान:महमद पैगंबर.djvu/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ७३ । प्राणांतिक उपोषणाचे पिस्तुल हिंदुसमाजावर रोखून व त्या ‘अहिंसक' शस्त्राचे बार सा-या जगभर ऐकू जातील याची दक्षता घेऊन, गांधीजींनीं जो पुणेकरार घडवून आणला त्याने शेवटीं कोणाचेच समाधान झाले नाहीं ! पूर्वास्पृष्टहि त्या कराराविरुद्ध जळफळत आहेत आणि बंगालमधील सवर्ण हिंदु तर त्या कराराची आठवण झाली की नुसते रागाने लाल होत आहेत ! गेल्या युद्धांत हिंदुस्थानने साम्राज्याला मनोभावे मदत केली तिचे वक्षिस म्हणून जालियनवाला बागेतले हत्याकांड पदरांत पडलें ही हिंदु राष्ट्रभक्तांची तक्रार अगदी रास्त आहे. पण, त्याबरोबरच त्यांनी तितक्याच त्वेषाने हीहि तक्रार केली पाहिजे की, मुसलमानांच्या मोहबतीखातर खिलाफतीच्या चळवळीप्रीत्यर्थ हिंदूंनी सर्व प्रकारे जी मदत केली तिचा मोबदला म्हणून मुसलमानांनी त्यांना मोपला प्रकरणांतील हत्याकांडाचे खरपूस बक्षिस तर दिलेच; पण त्याशिवाय, काळजाला कटयारीसारखें हरघडी रुतत राहणारें जातिनिर्णयरूपी वक्षिसहि त्यांनीच हिंदूंना दिलें ! कानाला गोड लागणारी वचने कृतीचा प्रसंग येतांच इंग्रजांकडून विसरलीं जातात व या वचनभंगामुळे भारतीयांची हृदये कायमचीं विद्ध होतात ही हिंदु राष्ट्रभक्तांची तक्रार खरी आहे. पण, ती एकट्या इंग्रजांविरुद्ध करून काय होणार! इंग्रजांनीं 'भाई' म्हणून तरी हिंदूंचा विश्वासघात केलेला नाहीं ! भरल्यापोटीं व्याख्यान देतांना करावयाची शाब्दिक आतषबाजी म्हणून राजकारणाचे अध्यात्मीकरण आणि उदात्तीकरण' वगैरे शब्दप्रयोग हिंदूंनी खुशाल, अवश्य वापरावे ! पण, प्रत्यक्ष राजकारणाचा व्यवहार करावयाला बसण्यापूर्वी त्यांनी हे सारे शब्दप्रयोग बाटलींत कोंबून टाकावे व त्या बाटलीवर ‘Poison' (विष) ही ठळक चिठी त्यांनी लालभडक शाईने लिहून लावावी ! जगांतील राष्ट्र व भोंवतालचे समाज पाशवी मनोरचनेतून (Animalism) अद्याप पुरतेपणीं बाहेरहि पडावयाचे आहेत; तोच हिंदुसमाजाने फाजील बुद्धिवादापर्यंत (Rationalism) मजल मारली यांतच हिंदुसमाजाच्या ऐहिक अपकर्षाची बीजे सांठलेली आहेत ! साया अहंदुसमाजांत भिनलेल्या पाशवी प्रवृत्तीइतपत तरी पाशवी