पान:महमद पैगंबर.djvu/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास दोघांशींहि वागतांना ते याच न्यायाने वागतात आणि या दोघांनाहि आशेला लावून, ते आपला बाजारभाव वाढवून घेतात. अशा भाकड वाटाघाटींतूनहि साधेल तितका स्वार्थ साधण्याला मुसलमान टपलेलेच असत ! असल्या भाकड वाटाघाटी, मुसलमानांचा जागरूकपणा व ब्रिटिशांचा धोरणीपणा यांतूनच जिनांचे चौदा मुद्दे निघाले आहेत व जातीय निर्णयहि पर्यायाने याच पद्धतीने उरावर बसला आहे ! हरिश्चंद्राच्या बोकांडीं बसून त्याने स्वप्नांत दिलेले वचनसुद्धां पुरे करून घेणा-या विश्वामित्राची उपमा सध्यांच्या काळांत कुणाला साजत असेल तर ती हिंदी मुसलमानांना होय ! लखनौ करारांतली योजना सगळ्या हिंदुस्थानांतल्या हिंदुमुसलमानांचे चित्र डोळ्यांपुढे ठेवून आंखलेली आहे. परस्परांच्या समजुतीने सर्व हिंदुस्थानची योजना म्हणून एकादी नवी योजना सिद्ध होईपर्यंत ती योजना बदलण्याचे कारणच नव्हते; पण, मध्यंतरींच्या काळांत ऐक्य-चितामणींनीं जो चाळा करून ठेविला तोच हिंदूना घातक ठरला ! १९२७ सालीं सायमन कमिशन नेमले गेले व त्याच्यावर बहिष्कार घालण्याचे राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांनी ठरविले. सायमन कमिशनला उत्तर म्हणून नेहरू रिपोर्टातली योजना मोठ्या विचारपूर्वक तयार करण्यांत आली. ही योजना सगळ्या हिंदुस्थानच्या स्वायत्त कारभाराची योजना म्हणून बहुतेक पक्षांना मान्य झाली. ब्रिटिश भारताच्या स्वायत्त सरकारचे हिंदी संस्थानिकांशी संबंध कसे असतील याचेहि दिग्दर्शन या रिपोर्टात करण्यांत आलेले आहे. वडिलांनी तयार केलेला हा रिपोर्ट चिरंजीवांनीं रावी नदीत बुडविला असे या रिपोर्टबद्दलचे एक वर्णन रूढ आहे. या रिपोर्टातला स्वराज्याचा भाग, जड म्हणून कीं काय कोण जाणे, रावी नदीच्या गाळांत रुतून खोलांत गाडला गेला; पण, मुसलमानांना सोईस्कर असलेला हलका भाग मात्र नेमका तरंगत वर आला व मुसलमानांना त्याचा उपयोगहि झाला. ऐक्यासाठी धडपड, ऐक्यपरिषदा, उपोषणे इत्यादि धांवपळीची उदाहरणे म्हणून गांधीजींनी लंडनमधील मुक्कामांत मुसलमानांशी केलेल्या वाटाघाटी, गांधीजींच्या उपोषणांतून निघालेला पुणे करार व त्या करारानंतर बंगाल fThoughts on Pakistan, pp. 364-65.