पान:महमद पैगंबर.djvu/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ६५ मोपल्यांचे बंड याच आभासांतून निर्माण झाले. २० ऑगस्ट १९२१ रोजी हे बंड प्रकट स्वरूपांत दिसू लागले व मलवारांतला लष्करी कायद्याचा अंमल २५-२-१९२२ रोजी खलास झाला. या ७-८ महिन्यांनंतर मलबारांत ब्रिटिश सत्ता फिरून खंबीरपणाने नांदू लागली; पण, मधल्या काळांत तेथील हिंदूचे जीवन मात्र अक्षरशः असह्य झाले ! माणुसकीला लांछन लावणारे प्रकार मलबारांत कसे घडले याचे सरकारी प्रतिवृत्तांतलें वर्णन डॉ० आंबेडकर यांनी उद्धृत केले आहे. हत्याकांडे, बलात्काराने झालेली धर्मांतरें, मंदिरें उध्वस्त करण्याचा सपाटा, गरोदर स्त्रियांच्या शरीराच्या चीरफाडीसारखे अत्याचार करण्याची लाट, लूट, जाळपोळ इत्यादि सर्व प्रकार घडले* खच्या भूतदयेची व न्यायाची अधिक चाड बाळगणारा अगर असहाय हिंदूंच्या भवितव्याबद्दल कमी बेफिकिरी बाळगणारा दुसरा कोणीहि राष्ट्रनेता असता तर, त्याने या हत्याकांडाबद्दल नापसंतीच व्यक्त केली असती ! पण, गांधीजींनीं मोपले है। पापभीरू व देवभीरू (God-fearing) असल्याचे प्रशस्तिपत्र मोपल्यांना दिलें ! मोपला प्रकरणाची चर्चा काँग्रेसच्या समित्यांतून झाली; तेव्हां, त्या समित्यांतल्या मुसलमान गांधी-बंधूनी, आपल्या धर्मशास्त्राच्या आधारें, मोप ल्यांच्या नादिरशाही वर्तनाचे समर्थनच केलें ! कसल्याहि अत्याचारापुढे व अन्यायापुढे नमणे हे माणुसकीला कमीपणा आणणारे आहे हे विसरून, या समित्यांतल्या राष्ट्रधुरीणांनी मूळ ठरावांतली कडक वृत्ति पार पातळ करून टाकली ! लजपतराय, मालवीय, मुंजे इत्यादींना हा मुसलमानभाजणेपणा शल्यासारखा बोंचू लागला. हिंदूंना न्याय मिळावा व त्यांच्या हिताचे संगोपन व्हावे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची जरुरी त्यांना पटू लागली व हिंदुमहासभेचे महत्त्व हळुहळू वाढू लागले. | नव्या सुधारणांचा नवा मनु सुरू झाला असल्याचे जाहीर करण्यासाठी बादशाहांचे काका हिंदुस्थानांत आले. दिल्लीच्या विधिमंडळाचे उद्घाटन करतांना त्यांनी राजबंद्यांच्या मुक्ततेची घोषणा केली. वसाहतीचे स्वराज्य

  • Thoughts on Pakistan, p. 159.

५पाकि०