पान:महमद पैगंबर.djvu/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ३९। शुद्ध वृत्तिनिरपेक्षपणाने (objectively) विचार केला तर, लॉर्ड कर्झनने योजलेल्या अगर केलेल्या सर्वच गोष्टींना आज नांवें ठेवितां येणारहि नाहींत ! पोलिसखात्याची पुनर्घटना करण्यासाठी नेमण्यांत आलेलें कमिशन, प्लेगप्रतिबंधक उपायांची चौकशी करण्यासाठी नेमलेलें कमिशन, दुष्काळाच्या संकटाचा विचार करण्यासाठी नेमलेले कमिशन इत्यादि गोष्टी वाईटच होत्या असें नाहीं; पण, परकीय शासनसंस्थेकडून केल्या जाणा-या गोष्टींचा विचार करतांना त्या गोष्टींमागे असलेल्या वृत्तीचाच विचार प्रजेकडून प्राधान्य करून केला जातो. 'अमृतमपि विषम् ' असा अनुभव यामुळे येतो. मग, जे विषच आहे ते प्रजेला किती जहरी वाटेल, हे काय सांगायला पाहिजे ? वाढत्या शिक्षणामुळे देशांत उद्भवलेल्या नव्या चैतन्याला भिऊन, कर्झनने विद्यापीठांच्या कारभारांत सरकारी होयबांचा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला; त्याबरोबर लोकमत जास्तच खवळले. स्थानिकस्वराज्यसंस्थांचे अधिकार संकुचित करण्याच्या कर्झनच्या प्रयत्नामुळेहि असंतोष वाढीस लागला. या असंतोषामुळे, बंगालमध्ये गुप्त संघटना करण्यांत व क्रांतिप्रवण मनोवृत्ति निर्माण करण्यांत अरिवंद बाबूंचे बंधु बारींद्रकुमार घोष यांना कसे यश आले याची हकीकत सरकारी प्रतिवृत्तांतच देण्यांत आलेली आहे.* रँड-आयर्टचा खून होऊन त्या प्रकरणाचा निकाल झाला; तरी चाफेकर प्रकरण महाराष्ट्रांत धुमसतच होते. चाफेकर बंधूंची माहिती सरकारला पुरविणा-या द्रविड बंधूचा १८९९ च्या फेब्रुवारींत खून झाला. या प्रकरणीं फरासखान्यांत चौकशी चालू असतां चाफेकर बंधूपैकीं धाकटे वासुदेवराव यांनी आगरख्यांत लपविलेले सहाबारी पिस्तूल काढून फौजदार रामजी पांडु व बुइनसाहेब यांजवर झाडले. द्रविडबंधूच्या खुनाचा पत्ता लागला; पण, झाडाच्या देठांतून देठ निघावे त्याप्रमाणे खुनांतून खून निघू लागल्यामुळे, इंग्रजी पत्रे कटाच्या कल्पनेचे घोडे नाचवू लागली. (केळकरकृत टिळकचरित्र : पूर्वार्ध : पृ. ६५६-६५७). मित्रमेळा वगैरे चळवळींच्या द्वारा नाशिक भागांत नवे चैतन्य निर्माण केल्यावर, सावरकर बंधूंपैकीं विनायकराव हे १९०१ साली पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या प्रेरणेमुळे पुण्यातल्या व पुण्याबाहेरील मराठी मुलखांतल्या

  • Sedition Committee Report 1918, pp. 15-17.