पान:महमद पैगंबर.djvu/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० - पाकिस्तानचे संकट दावें सैल केल्याचे आमिष दाखविणे अपरिहार्य असल्याचे दिसू लागलें कीं, मालक तिच्या गळ्यांत लोढणे अडकवितो, तसाच प्रकार येथे झाला. मुसलमान समाजाने काँग्रेसच्या नादी लागू नये म्हणून 'अँग्लो मुस्लीम डिफेन्स असोसिएशन' काढण्यांत आली होती. राष्ट्रीय आंदोलनाच्या पहिल्या अवस्थेत मुसलमानांचा उपयोग लोढण्यासारखा (Counter-poise) झाला. संस्थानिक, अँग्लो इंडियन, मागसलेले वर्ग वगैरेंचाहि उपयोग यापुढील काळांत याच दृष्टीने करण्यांत आला. पण, लोढणे बनण्याचा मान मिळविण्यांत मुसलमान हे जसे कालदृष्ट्या श्रेष्ठ तसेच ते या बाबतींत सर्वच दृष्टींनीं श्रेष्ठ आहेत ! मुसलमानांच्या राजनिष्ठेची खात्री पटून त्यांची उपयुक्तता दिसू लागतांच लष्करी नोकरीच्यादृष्टीनेंहि त्यांचे महत्त्व वाढू लागावें हें स्वाभाविक होते. त्या वेळच्या लष्करी धोरणांच्या दृष्टीनेंहि मुसलमानांना हे महत्त्व मिळणे क्रमप्राप्त होते. रशिया हिंदुस्थानवर स्वारी करणार या खया- खोटया भीतीने हिंदुस्थान सरकारची लष्करी धोरणे त्या काळांत आंखलीं जात असत,हे प्रसिद्ध आहे. पण माणूस वाघाला भितो तसा वाघहि माणसाला भितो म्हणतात. रशियाचे गुप्त हेरखाते त्या वेळी झारला रशियावर होऊ

  • या धोरणाची कल्पना येण्याच्या दृष्टीने पुढील उतारा वाचनीय आहे : १८८५ साली रशियन सेनापति केमराफ याने जेव्हां अफगाणिस्थानच्या सरहद्दीवरील पंजड़े गांव घेतले, तेव्हां रशियाचे व इंग्लंडचे युद्ध होण्याची वेळ आली होती. पण, अमीरानें पंजडेवरील आपला हक्क सोडून दिल्यामुळे ते प्रकरण सलोख्याने मिटले जाऊन तेव्हांच शांतता झाली. तथापि, अफगाणिस्थान व इराण आणि अफगाणिस्थान व रशिया यांच्या दरम्यानची सरहद्द ठरवून देण्याच्या कामीं हिंदुस्थान सरकारने पुढे बराच खर्च केला. रशियाचे भीतीचे एवढ्यानेच निराकरण झाले असे नाही. तर सरहद्दीवरील किल्ले बळकट करणे आणि तेथे रेल्वे बांधणे या कामीं कोटयवधि रुपयांचा चूर झालेला आहे. बलुचिस्थानास क्वेट्टा प्रांत जो सन १८८७ सालीं जोडला गेला आणि सन १८९५ सालीं चित्रळचे जे प्रकरण उपस्थित झाले त्यांतील वीजहि हेच होय.

-लो. टिळकांचे केसरींतील लेख, राजकीय खंड २, पृ॰ ३०८.