[ २६६ ] नष्ट करण्याचा त्यांनीं विडा उचलला. पूर्वापार चालत आलेल्या आमच्या धर्माचा नाश करण्याकरितां, महमद व त्याचे अनुयायी यांनी आमच्या शत्रूच्या शहराचा आश्रय करून ह्या नवीन मताचा फैलाव करण्याचे मांडिलें आहे, तेव्हां समस्त अरबस्थानाने एकत्र होऊन त्या लोकांनां निर्मूळ केले पाहिजे, असे त्यांनी जाहीर केले. ह्या मुसलमान लोकांचा अदृश्य परमेश्वर, त्याची अनन्य भावाची पूजा, हीं व परस्परांवर प्रेम करण्याचा व अंतःकरणांत सुविचार ठेवण्याचा जुलूम आह्मांस नको; व ह्या गोष्टींकरितांच ह्यांनी आमचे पुरातन देव सोडून दिले आहेत, तेव्हां अशा पिशांस जगांतून निर्मूळच केले पाहिजे, असे पैगंबराचे शत्रू ह्मणत. अशा जालीम लोकांपासून आपला व आपल्या शिष्यमंडळीचा बचाव करून घेणे अवश्य होते. हा बचाव करण्यासाठी पैगंबराने जर तरवार हातीं धरली नसती, तर तो व त्यांचे शिष्यमंडळ रसातळास जाऊन पोंचले असते. जेव्हां शत्रूनीं पैगंबरावर हल्ला करण्यास प्रारंभ केला तेव्हां आपलें व लोकांचे रक्षण होण्यासाठी तरवार घ्यावी ह्मणून ह्याने आपले शिष्यांस सांगितले. परमेश्वराच्या भक्तांत आपलें गणगोत आहे, त्यांच्या बरोबर आपल्या आणाभाका झाल्या आहेत, त्यामुळे त्यांची व आपली दोस्ती झाली आहे ह्या सर्व गोष्टींचा विसर पडून जेव्हा तुमच्या अंगावर ह्या देशांतील लोक दौड करून येतील त्या प्रसंगी तुह्मी आपला बचाव करण्यास
पान:महमद पैगंबर.djvu/270
Appearance