हिंदुसंघटनेचा महामंत्र २३९ स्मरण जागृत असल्यामुळे, हिंदुराष्ट्राचे भवितव्यहि उदात्त व उज्ज्वल ठरल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास रावापासून रंकापर्यंत व खाशापासून खंकापर्यंत सर्वांना वाढत्या प्रमाणांत वाटू लागला आहे. या आत्मविश्वासाचा फायदा घेऊन हिंदुसंघटनेचे कार्य संघटित स्वरूपांत मांडणे व चालविणे हा प्रश्न तांतडीचा प्रश्न म्हणून प्रत्येक हिंदु तरुणाने हाती घेतला पाहिजे. हे कार्य स्वरूपतः किती व्यापक आहे व त्या कार्याच्या सिद्धीसाठी केवढ्या विशाल मनाची अपेक्षा आहे याचे त्रोटक विवेचन यापूर्वी केलें तें अशासाठीं कीं, मानव्याची सेवा करण्याचे विशाल ध्येय पटून तरी, हिंदु तरुणांनी या कार्याकडे वळावें ! आजवर आपण भूतदया आणि विश्दबंधुत्व या अतिविशाल कल्पना उराशी बाळगल्या व या कल्पनांच्या नादीं लागून आपण तीस कोटी हिंदूंच्या प्रपंचाची स्थिति काय आहे या प्रश्नावडे दुर्लक्ष केलें ! ‘प्रपंच सोडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कडी व्हाल' हा रोकडा अनुभव आपल्या पदरात पडला ! यजनयाजनप्रसंगी मक्षिकापिपीलिकेचीहि हत्या आपल्या हातून घडू नये इतकी आपली भूतदया अतिरेकाला पोंचली ! पण, तीस कोटी हिंदुसमाजांतले आपले कोट्यवधि बंधु रोज मृत्यूशी झगडत आहेत या सत्यस्थितीचे स्मरणहि आपल्याला राहिले. नाहीं ! 'First things must come first' (सर्वोत्तम महत्त्वाच्या गोष्टींकडे सर्वांआधीं लक्ष पुरविले पाहिजे) ही जगांतली रीति व नीति यापुढे तरी आपण विसरता कामा नये. तीस कोटी हिंदू हें एक विश्वच आहे आणि या हिंदूंबद्दल भ्रातृभावना बाळगणे हेच विश्वबंधुतेचे खरे लक्षण आहे ही गोष्ट आपण सर्वांना पटवून दिली पाहिजे. भूतदयेच्या भाबड्या कल्पना झुगारून द्यावीप कोटी हिंदुसमाजांत जे कोट्यवधि दयार्ह स्त्रीपुरुष व लेंकरें आहेत त्यांच्याविषयींची दया बाळगा, म्हणजेच ख-या भूतदयेचे पूण्य पदरीं पडेल हे जाणत्या हिंदूंना पटवून देण्याची तांतडी केली पाहिजे. तुफान दर्या हेच ज्या वर्गाचे ऐसपैस शेत असा कोळीसमाज, दयाखो-यां तून राहणारा व वन्य वस्तूंवर उदरनिर्वाह करणारा कातकरी समाज-अशा समाजांत हिंदुत्वाची जागृति करणे व त्या समाजांवर हिंदुत्वाचे संस्कार . . '
पान:महमद पैगंबर.djvu/246
Appearance