पान:महमद पैगंबर.djvu/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री। २०५ आक्षेपाला उत्तर देणे मुळीच अवघड नाहीं. काँग्रेसने जे केले त्याचा तरी अर्थ याहून वेगळा होतो कोठे ? मुंबई प्रांतांत काँग्रेसने बॅ० नूरी यांच्या खेरीज जे मंत्रि निवडले ते सर्वसामान्य मतदारसंघातर्फे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले लोक होते. स्वतंत्र म्हणून निवडून आलेल्या नूरींचा मंत्रिमंडळांत समावेश करावा लागला याचाच अर्थ असा की, सर्वसामान्य मतदारसंघाबाहेर काँग्रेसला मान्यता नव्हती. मौलाना अझाद यांनी निवडल्यामुळे आणि मुसलमान असल्याचा जन्मजात गुण अंगी असल्यामुळे, आदल्या दिवशीं फैज टोपी घालून आलेले नूरी दुस-या दिवशीं मंत्रि झाले आणि मग गांधी टोपी वापरू लागले ! स्वतंत्रपणे निवडून आल्यावर, स्वेच्छेने गांधी टोपी घालू लागलेल्या अॅ० चक्रनारायण या खिश्चनं गृहस्थांना मंत्रिमंडळांत घेण्यांत आलें नाहीं व या अन्यायाचे शल्य मनाला टोंचत राहिल्यामळे, अॅ० चक्रनारायण यांनी पुढे असेंब्लींतील काँग्रेसपक्षाचा राजीनामा दिला, या गोष्टी सर्वश्रुत आहेत. अशा रीतीने मुस्लीम मंत्रि घेऊन, काँग्रेसने आपला देशप्रतिनिधित्वावरचा हक्क गमावला व आपण फक्त सर्वसामान्य मतदारसंघांत समाविष्ट झालेल्या म्हणजेच प्रायः हिं–लोकांचे प्रतिनिधित्व करू शकतों ही गोष्ट काँग्रेसने आपल्या वर्तनाने पदरांत घेतली. एकीकडे ही कृति करणारी काँग्रेस इतर सर्व बाबतींत आपला जुना हेका चालवीतच राहिली. हा हेका आजपर्यंत अव्याहतपणे चालूच आहे. हिंदु म्हणून हिंदूचे कांहीं हितरक्षण होणे अवश्य असेल तर ते कार्य कॉग्रेस करू शकणार नाहीं; ते कार्य करण्याची ठेकेदारी आपण घेतली असल्याचे हिंदमहासभा म्हणत असते, असे उद्गार गांधीजींनीं 'हरिजन' मध्ये महायुद्धाच्या सुरुवातीनंतरच्या एका लेखांत काढिले होते. गेल्या मे महिन्यांत सपू-गांधी पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला व त्यामुळे १६-२-४१ रोजी गांधीजींनीं सर तेजबहादुर सपू यांना लिहिलेले एक पत्र लोकांपुढे