पान:महमद पैगंबर.djvu/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री २०१६ गांधीजींच्या या सर्व लिहिण्याचा सूचितार्थ असा आहे कीं, त्यांच्या मते सध्यांच्या परिस्थितींत तरी, सध्यांच्या काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्रीच झालेली आहे ! नवे अहिंसामुनी मिळवून गांधी नवी सृष्टि कशी काय निर्माण करणार हा अश्न आजचा नसून, असलाच तर तो उद्यांचा प्रश्न आहे ! जे ‘अहिंसा-मुनी' मिळवून गांधीजी नव्या त-हेने काँग्रेसची घडी बसविणार ते मुनिश्रेष्ठ काक रंगारूपाचे असतील याचीहि कल्पना गांधीजींनीं देऊन ठेविली आहे. या मुनिश्रेष्ठांची मने हिंदु-मुसलमान-खिस्ती-पारशी अशा पाथव विचारापासून सर्वस्वी अलिप्त असली पाहिजेत ! इतकें पराकोटीचे रंगरूपराहित्य प्रथम दिसणार नाहीं मौलाना अबुल । कलाम आझाद यांच्या ठिकाणीं ! काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून । अधिकृत भाषण करतांना ज्या मौलानांना मुस्लीमधर्म व मुस्लीम - संस्कृति यांचा अभिमान विसरणे शक्य झाले नाहीं त्या मौलानांना या मुनिश्रेष्ठांच्या मालिकेत स्थान कसे मिळेल ! । सरदार पटेल, श्री राजगोपालाचारियर, श्री सत्यमूत, श्री० भुलाभाई देसाई, इत्यादींनाहि या संघटनेत स्थान मिळेल, असे दिसत नाहीं ! मात्र, ही नवी सृष्टि प्रामाणिकपणाच्या पायावर उभारली गेली पाहिजे !... . गांधीजींच्या अहिंसाप्रेमामुळे काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री झाल्या सारखी दिसते. त्या प्रमाणेच, काँग्रेसच्या मुसलमान-विषयक धोरणामुळेहि ती संस्था राजकारण करण्याला असमर्थ झाल्यासारखी दिसते. हिंदुस्थानांतील जातिजातींत असलेल्या भेदांचे महत्त्व अवास्तव फुगवून सांगण्याचे व्रत ब्रिटिश राज्यकर्ते चालवीत होते ते त्यांच्या स्वार्थी दृष्टीने ठीकच होते. पण, याच व्रताची नक्कल करून काँग्रेसचे नेते गांधीजी हेहि १९२० सालापासून असे म्हणू लागले कीं, हिंदु-मुसलमान ऐक्याशिवाय स्वराज्यप्राप्ति अशक्य आहे ! स्वराज्याच्या लढ्यांत मुसलमान स्वातंत्र्यप्रेमामुळे सामील झाले तर त्यांचे सहकार्य सर्वांना हवेंच आहे. :: हिंदुमहासभेचे अध्यक्ष बॅ० सावरकर" याल तर तुमच्यासह असे म्हणतात त्याचाहि अर्थ हाच कीं,स्वराज्यप्राप्तीच्या लढ्यांत । ... मुसलमान बिनतक्रार, बिनबोभाट व बिनशर्त सामील होतील .::