पान:महमद पैगंबर.djvu/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुसलमानांच्या हृदयपालटाची जरुरी १९५ मानांना नव्या सवलती देण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाहीं. डॉ० आंबेडकरांचा तिसरा प्रश्न अशा रीतीनें आपोआपच निकालांत निघतो. पाकिस्तान कबूल करावयाचें कीं सत्ताविभागणींत मुसलमानांना ५० टक्के जागा देऊन त्यांना संतुष्ट राखावयाचे, असे दोनच प्रश्न हिंदुसमाजापुढे आ वासून उभे आहेत आणि त्यांतल्या कोणत्या तरी एकाचा स्वीकार करण्याशिवाय हिंदुसमाजाला गत्यंतर नाही, अशी डॉ० आंबेडकरांच्या चौथ्या मुद्यांतील र्गाभत सूचना आहे. ही सूचनाच बरोबर नाहीं. हिंदुसमाज या दोहोंपैकी कोणत्याच गोष्टीला मान्यता देणार नाहीं. हिंदु समाजाच्या जबरदस्त विरोधाला अव्हेरून इंग्रज सरकार मुसलमानांना यांतलें कांहींहि देऊं लागेल तर, संघटनेने सबल झालेला हिंदुसमाज 'इंद्राय तक्षकाय स्वाहा' या न्यायाने, स्वत:चा स्वाभिमान सिद्ध करण्यासाठी, काय करावयाचें तें अवश्यमेव ठरवील ! बर्वे टेलरिंग फर्मने गेल्या १२ वर्षांत उत्तम त-हेने केलेली पुर्णकरांची सोय उत्तम, मोहक । टेलरिंग उत्कृष्ट, सुंदर ) ९ निरनिराळ्या डिझाइनचा, वुलन, कॉटन, || रेशमी वगैरे सर्व प्रकारचा कापड माल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण उत्तम क्लॉथ स्टोअर्स प्रो. के. एल्. बर्वे, अप्पा बळवंत चौक, पुणे २.