पान:महमद पैगंबर.djvu/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुसलमानांच्या हृदयपालटाची जरुरी १९३ आपल्या औदार्याचा जगांत दुरुपयोग होतो, आपल्या . साविकपणाचा इतरांच्या तामसीपणामुळे चेंदामेंदा होतो आणि आपला चांगुलपणा शेवटी आपल्याच हिताला बाधक ठरतो या गोष्टी जगाच्या व्यवहाराकडे डोळसपणाने पाहणा-या हिंदु • समाजाला आतां पक्केपणीं कळलेल्या आहेत. मुसलमानांशी तडजोडीचे बोलणे करणे म्हणजे आपल्या हाताने आपल्या हितावर पाणी सोडण्याला प्रवृत्त होण्यासारखे आहे हे शहाणपण, भारी किंमत देऊन, हिंदुसमाज आतां शिकला आहे. मुसलमानांशीं होणारा कोणताहि राजकीय व्यवहार देवाण-घेवाणीच्या स्वरूपाचा असू शकत नाहीं, अशा व्यवहारांत आपल्याला सारीच देवाण करावी लागते, घेवाणीचा संबंधच उरत नाहीं हा रोकडा अनुभव हिंदुसमाजाने आतां आपल्या संग्रहीं बाळगला आहे. आणि म्हणून, यापुढील काळांत हिंदुसमाज मुसलमानांशी कसलेंहि, तडजोडीचे, सलोख्याचे, खेळीमेळीचें अगर देवाणघेवाणीचे बोलणेच करण्याला तयार नाहीं ! इंग्रजांपासून मिळेल तो फायदा मिळवावा, हिंदूंच्या अधीरपणाचा फायदा घेऊन शक्य तें जातिहित साधावे अशा वृत्तीने वागून मुसलमानांनी आपली किती नागवण केली आहे हे हिंदुसमाज सहजासहजीं विसरेल, हे शक्य दिसत नाहीं. तडजोडीची उत्सुकता आजवर हिंदुसमाज दाखवीत आला आहे. यापुढे ती उत्सुकता मुसलमानांच्या बाजूने दाखविली गेली. पाहिजे. भांडण होण्याला जसे दोन पक्ष लागतात तसे ऐक्य साधनालाहि दोन पक्ष अवश्य असतात. आजवरची बहुतेक सारीं ऐक्याची बोलणी एकपक्षीय होती; आणि, म्हणूनच ती अस्वाभाविकहि होतीं. आजवरचा हा अस्वाभाविकपणा व एकपक्षीयपणा फटक्यासरशीं निघून जाण्याचा एकच एक मार्ग शिल्लक राहिलेला आहे. मसलमानांचा हृदयपालट होणे आणि त्या हृदयपालटाचीं मूर्तिमंत लक्षणे म्हणून वर निर्दिष्ट केलेल्या गोष्टी त्या समाजाने करणे, हाच तो एकमेवः मार्ग होय. डॉ० आंबेडकर यांनी पाकिस्तानवरील आपल्या ग्रंथाच्या उपसंहारारात्मक भागांत वादी-प्रतिवादींमधील दाव्यांत मुद्दे काढण्यांत येतात तसे; १३प कि०