पान:महमद पैगंबर.djvu/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ पाकिस्तानचे संकट चित्ताला लीगच्या या अवसानघातकीपणामुळे जबरदस्त धक्का बसलेला आहे. तेव्हां, कोणी हिंदु पुढारी आपल्यापाशीं वाटाघाटी करावयाला येतील आणि आपण आपला कार्यभाग साधून घेऊ अशा भ्रमांत लीगमधील मुसलमानांनीं व लीगच्या बाहेरील मुसलमानांनी यापुढे राहूं नये. बालीच्या जप्त जमिनी आपल्या पायाने चालत स्वगृहीं येतील असे विश्वास जनक उद्गार सरदार वल्लभभाई पटेल हे बालीच्या खेडुतांपाशीं काढीत. असत. | हिंदुस्थानचे स्वराज्य आपल्या पायाने चालत आमच्याकडे येईल असे विश्वासगर्भ उद्गार हिंदुलोक आतां काढू लागले असल्यामुळे, आपल्या अडेलतट्टूपणाला बाजारभाव येईल या समजुतीच्या धुक्यांतून बाहेर पडण्यांतच भारतीय मुसलमानांचे कल्याण आहे. देवाण-घवाणीच्या तत्त्वावर केलेला लखनौ-करार मोडून मुसलमानांनी गेल्या पाव शतकांत जे स्वार्थीपणाचे मुद्दे पदरात पाडून घेतलेले आहेत त्या सर्वांवर पाणी सोडण्याची मुसलमान तयारी दाखवितील तरच यापुढे हिंदु त्यांच्यावर थोडाफार विश्वास ठेवण्याला प्रवृत्त होतील. हिंदुस्थानांतील परस्परविरोधी जमातींमध्ये व हितसंबंधांमध्ये सलोखा घडून येत नाही म्हणून ब्रिटिश मुत्सद्दी गळे काढकाढून रडत असतात. या कांगावखोर मुत्सद्यांना हिंदुसमाज यापुढे हेच उत्तर देईल की, आमच्यांत झालेली एकी तुम्ही बिघडविलेली आहे; आणि, आमच्यांत एकी व्हावी अशी तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही त्या एकांत जो बिब्बा भरलात तो तरी तुम्हीं ब-याबोलाने काढून घेतला पाहिजे. ब्रिटिश मुत्सद्दी जोपर्यंत ही गोष्ट करणार नाहींत, जातिनिर्णयांतील प्रांतरचना व मतदारसंघांची रचना या सर्व गोष्टी रद्द करून, लखनौ कराराने र्नािमलेली परिस्थिति पुनः निर्माण करण्याचा प्रामाणिकपणा ते जोंवर दाखविणार नाहींत तोंवर त्यांच्या कांगावखोरपणाला उद्देशून हिंदुसमाज । म्हणत राहील :