पान:महमद पैगंबर.djvu/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ पाकिस्तानचे संकट । बृत्तीमुळे निर्माण होतो; आणि, हिंदुधर्मात आज हा गुण पराकोटीला जाऊन पोहोंचलेला दिसत असेल तर त्याचे मूळ कारण हेच आहे. केवळ बाहय आचार, केवळ एखाद्या विशिष्ट उपास्याबद्दलची भक्ति, केवळ एखाद्या प्रेषिताच्या अंतःस्फूर्तीवरील 'श्रद्धा यांच्या पायावर हिदुधर्म उभा असता तर, अत्यंत शास्त्रशुद्ध धर्म म्हणून आज त्याचा जगभर जो लौकिक झाला आहे तो झालाच नसता. अशी आग्रही वृत्ति हिंदुधर्मात नसल्यामुळेच, हिंदुधर्माने चार्वाकासारख्या बंडखोरालाहि आपल्या ऐसपैस कक्षेत स्थान दिले आणि बौद्ध, लिंगायत वगैरे अनेक बंडखोर पंथ निघाले तरी, हिंदधमचे मन:स्वास्थ्य ढळलें नाहीं. सहिष्णुता या गुणाला हिंदुधर्मात व हिंदुसमाजांत दुर्गुणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे ते का, या प्रश्नाचा छडा लावण्याचा प्रयत्न जो जो मनुष्य करील त्या त्या मनुष्याला हिंदुधर्मातील या वैशिष्ट्यापर्यंत जाऊन भिडावे लागेल. महंमद, ख्रिस्त वगैरेंनी ज्या धर्माचे प्रवर्तन केले त्या धर्माच्या अनुयायांमध्ये ही सहिष्णु वृत्ति निर्माण होऊ शकली नाही. याचे कारणच हें कीं, ते धर्म शास्त्रीय चिकित्सेच्या कसोटीला उतरणाच्या तत्त्वज्ञानावर आधारलेलेच नाहींत. अशा धर्मांना इंग्रजींत Credal Religions . म्हणतात. ('व्यक्तिनिष्ट धर्म' या शब्दप्रयोगाने मळच्या इंग्रजी शब्दांत अभिप्रेत असलेला अर्थ व्यक्त करता येईल.) हिंदुधर्माचे हे वैशिष्ट्य बरें कीं वाईट, या वैशिष्ट्यामुळे हिंदु समाजाचे हित झालें कीं अहित झालें या प्रश्नांची उत्तरे येथे देत बसण्याचे सुंदर चहासाठी नावाजलेले विद्यार्थ्यांचे अत्यंत आवडते बाँबे रेस्टॉरंट, पेरूगेट सदाशिव पेठ, पुणे. प्रोप्रायटर-जी. डी. तुळपुळे,