पान:महमद पैगंबर.djvu/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्विराष्ट्रवादाचे खंडन १५३ धर्मनिरपेक्ष दृष्टीने सहकार्य करावे, हेच श्रेयस्कर ! तसे करण्याची त्यांची इच्छा नसेल तर लोकसंख्येच्या कांटेकोर न्यायाने त्यांना जे मिळेल तेवढ्यावरच त्यांना समाधान मानावे लागेल. | द्विराष्ट्रवाद अस्तित्वात आहे, हिंदुस्थानांत हिंदु व मुसलमान हीं दोन भिन्न व विरोधी राष्ट्रे आहेत असे गृहीत धरून, पाकिस्तान अपरिहार्य असल्याची कल्पना डॉ० आंबेडकर यांनी मांडली आहे. त्यांचे हे गृहीत कृत्यच तर्कशुद्ध नसल्यामुळे त्यांचे या मुद्यासंबंधींचे बरेचसे विवेचन अग्राह्य वाटते ! पण त्यांच्या ग्रंथांत इतर कांहीं भाग विचारार्हहि आहे. । .

सर्वस्वी प्रामाणिकपणा, सचोटी, सरळ व्यवहार. द. ना. हेजीब, पुणे किराणा व सुका मेवा यांचे व्यापारी स्थापना : सन १९२२ आमचेकडील सुका मेवा व निवडक किराणा माल वापरून आपली खात्री करा. पत्ता––२०, शुक्रवार पेठ, पुणे शहर.