पान:महमद पैगंबर.djvu/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्विराष्ट्रवादाचे खंडन १३७ त्यांना असे निश्चित म्हणतां आलें असतें कीं, समान नाग* रिकत्वाच्या पायावर हिदु, मुसलमान, खिस्ती, पारशी इत्यादि सर्वांचे राष्ट्र हिंदुस्थानांत निर्माण होतच नसेल तर, राष्ट्र म्हणून नांदण्याचा जास्तीत जास्त हक्क हिंदूंनाच पोचतो. " पण, डॉ. आंबेडकरांनी असे म्हटलें नाहीं. एकाच मुद्याला जास्त महत्त्व दिल्यामुळे विचाराचे अवधान कसे सुटते हें डॉ० आंबेडकरांनी या प्रकरणी जे विवेचन केले आहे त्यावरून स्पष्ट दिसते. द्विराष्ट्रवादांतला अत्यंत विचारार्ह मुद्दा कोणता याचे उत्तर त्यांनीं (पृ० २९वर) दिले आहे. हिंदु-मुसलमानांना एकत्र बांधणा-या व या दोन्ही समाजांच्या हर्षामर्षाला कारणीभत होणा-या कांहीं ऐतिहासिक गोष्टी आहेत काय, असा प्रश्न डॉ. आंबेडकरांनीं (पृ०२९ वर) उपस्थित केला आहे. हिंदु-मुसलमानांमधले ऐतिहासिक काळांतले झगडे विस्ताराने रंगवून (पृ० ३० व १० ४९-५९) डॉ. आंबेडकरांनी या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर दिले आहे. एकत्र नांदण्याची इच्छा हाहि एकराष्ट्रभावनेचा फार मोठा आधार आहे असे दिग्दर्शित केल्यावर, मुंसलमानांची हिंदूंच्या बरोबर नांदण्याची इच्छा नाहीं हे सिद्ध करण्यासाठी डॉ० आंबेडकरानी गेल्या वीस वर्षांत देशभर झालेल्या जातीय अत्याचारांची जंत्री विस्ताराने दिली आहे (पृ॰ १५८-१८३). १८९५ पासून पुढे जी जातीय दांडगाई सुरू झाली व जी दांडगाई यी क्षणापत्रंत एकसारखी वाढत अाहे तिचा विचार केला म्हणजे, हट्टमुसलमान समाजात एकत्र गवणान्या, दोन्ही समाजांनी ज्यांच्याबद्दल अभिमान बाळगावा, दोन्ही समाजांना ज्यांबद्दल उद्वेग वाटावा अशा गोष्टी मुळांत खरोखरच नसाव्या, असे वाटू लागते. पण, खी स्थिति तशी नाहीं हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या डाक्का शहरांत परवां कल्पनातीत जाळपोळ व हाणमर झाली व हिंदूंचे जीवन असह्य झाले त्याच डाक्का शहरातल्या हिंदु-मुसलमानांचे संबंध अॅसव्वाशे वर्षांपूर्वी किती एकसंध झालेले होते हैं। १८३९ साली लिहिण्यांत आलेल्या एका ग्रंथांतील पुढील उता-यावरून लक्षात येईल: Religious quarrels between the Hindus and the Mussalmans are of rare occurrence. These two classes live